अवघ्या ११ तासांत खडकवासला धरणसाखळीत १.३९ टीएमसी वाढ

Date:

सकाळी ६.९३ टीएमसी असलेला पाणीसाठा सायंकाळी ८.३२ टीएमसीवर; धरणसाखळी २८.५५ टक्के भरली

पुणे, दि. ६ जुलै : खडकवासला धरणसाखळीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात वेगाने वाढ झाली आहे. सोमवारी सकाळी ६ वाजता चारही धरणांमध्ये एकूण ६.९३ टीएमसी म्हणजेच २३.७८ टक्के पाणीसाठा होता. सायंकाळी ५ वाजेपर्यंत हा साठा ८.३२ टीएमसी म्हणजे २८.५५ टक्क्यांवर पोहोचला.

अवघ्या ११ तासांत धरणसाखळीतील पाणीसाठ्यात १.३९ टीएमसीची वाढ झाली असून टक्केवारीत ४.७७ टक्के गुणांची वाढ नोंदविण्यात आली आहे.

खडकवासला धरणातील साठा सकाळच्या ०.४० टीएमसीवरून सायंकाळी ०.६८ टीएमसीवर पोहोचला. धरणाची भरावक्षमता २०.३० टक्क्यांवरून ३४.३२ टक्क्यांपर्यंत वाढली आहे.

पानशेत धरणातील साठा ३.०३ टीएमसीवरून ३.३६ टीएमसी, तर वरसगाव धरणातील साठा ३.१९ टीएमसीवरून ३.७३ टीएमसीवर पोहोचला. सर्वाधिक ०.५४ टीएमसी वाढ वरसगाव धरणात नोंदविण्यात आली.

टेमघर धरणातील पाणीसाठा सकाळच्या ०.३१ टीएमसीवरून ०.५६ टीएमसीवर पोहोचला असून धरणाची टक्केवारी ८.३० वरून १४.९९ टक्क्यांपर्यंत वाढली आहे.

सकाळी ६ ते सायंकाळी ५ या कालावधीत खडकवासला परिसरात ४२ मिमी, पानशेतमध्ये ७७ मिमी, वरसगावमध्ये ७७ मिमी, तर टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक १६५ मिमी पावसाची नोंद झाली.

सायंकाळी ५ वाजता चारही धरणांतील एकत्रित आवक १ हजार ४०७ नोंदविण्यात आली आहे. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून अद्याप पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला नाही. पुणे महापालिकेसाठी ३७८ क्युसेक्स पाणीपुरवठा सुरू असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

गतवर्षी याच दिवशी धरणसाखळीत १८.३५ टीएमसी म्हणजे ६२.९५ टक्के पाणीसाठा होता. यंदाचा साठा गतवर्षीच्या तुलनेत अजूनही १०.०३ टीएमसीने कमी आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भारतीय नौदलाच्या युद्धनौकांच्या सिंगापूर भेटीची यशस्वी सांगता

मुंबई- भारत आणि सिंगापूर यांच्यातील दृढ सामरिक आणि सागरी भागीदारी...

फडणवीसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा: हर्षवर्धन सपकाळ.

७ हजार कोटी रुपयांच्या मिसिंग लिंकची दुर्दशा भ्रष्टाचारामुळे, देवेंद्र...

क्रांती दिनी होणार वंदेमातरमचा जागर

नागरिक सोशल फाउंडेशन...