समरसता लोककला संमेलन २०२६ चे २८ जून रोजी पुण्यात आयोजन

Date:

संमेलनाच्या अध्यक्षपदी पद्मश्री रघुवीर खेडेकर यांची निवड

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; लोककला, साहित्य आणि संस्कृतीचा अनोखा संगम

पुणे : लोककला, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारसा जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि महाराष्ट्र राज्य समरसता साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘समरसता लोककला संमेलन २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या संमेलनाच्या अध्यक्षपदी लोककलावंत पद्मश्री रघुवीर खेडेकर यांची निवड  करण्यात आली असून हे संमेलन २८ जून २०२६ रोजी होणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली. 

यावेळी धनंजय खुडे, विलास लांडगे, विजय मोरे, सुनील खंडाळे, रेश्मा मुसळे-परीतेकर, विकास माने, बाळासाहेब मालुसकर, जितेंद्र वाईकर, उपस्थित होते.  समरसता लोककला संमेलन २०२६ चे  उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार,  राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पुण्याच्या महापौर  मंजुषा नागपुरे, जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तर स्वागताध्यक्ष  भाजपचे पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे आहेत.

या संमेलनात  सकाळी 8 वाजता पुणे महानगरपालिका ते बालगंधर्व रंगमंदिर अशी लोककलावंतांची भव्य लोककला दिंडी निघणार आहे, त्यांचे उद्घाटन महापौर मंजूषा नांगपुरे यांच्या हस्ते होईल,  या दिंडीत गोंधळी, वासुदेव, शाहिर, भारूड, लावणी, दशावतार, आदिवासी नृत्य, झाडीपटी यांसारख्या सुमारे २५० लोककलावंतांचा सहभाग असणार आहे.दुर्मीळ लोकवाद्यांचे प्रदर्शन  बालगंधर्व रंगमंदिर, कला दालन  येथे असणार आहे त्यांचे उद्घाटन सकाळी 9.30 वाजता राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते होणार आहे. 

उद्घाटन सोहळ्या नंतर दुपारी 12 वाजता  विशेष मुलाखत सत्रात पद्मश्री रघुवीर खेडेकर आणि  लोककलावंत नंदेश उमप यांची मुलाखत  अभिनेते संदीप पाठक घेणार आहेत. दुपारी 1 वाजता कवी संमेलनात तुकाराम ढोले, प्रा. वा. ना. आंधळे आणि कुमार चव्हाण हे सहभागी होणार आहेत. दुपारी 2 वाजता आयोजित चर्चासत्रात डॉ. प्रवीण चोले, डॉ. प्रशांत पाटील आणि अभिनेत्री जायमाल इनामदार  सहभागी होणार आहेत.

संमेलनाचा समारोप मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपुरचे  कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून त्यानंतर लोककला सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी 250 कोटी गोळा केल्याचा आव्हाडांचा गंभीर आरोप

मुंबई- राज्यातील अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या कारभारावर...

सहकार मंत्रालयाच्या ५ वर्षपूर्ती निमित्त २९ जून ते ६ जुलै दरम्यान सहकारी सप्ताह

पुणे दि. २४ :भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या स्थापनेला पाच...

मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींची नेमणूक करण्याचे राजकीय पक्षांना आवाहन

पुणे, दि. २४ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदार...