७६ वर्षांनी घडले परिवर्तन; १३-० ने मिळवला ऐतिहासिक विजय
पुणे : शहरातील प्रमुख माध्यमिक शाळांची सहकारी पतपेढी असलेल्या पुणे माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘आपले विकास पॅनल’ने प्रतिस्पर्धी ‘आपले पॅनल’चा १३-० असे निर्भेळ यश मिळवले. तब्बल ७६ वर्षांनी ऐतिहासिक परिवर्तन घडले आहे. म.ए.सो. च्या भावे हायस्कुलमध्ये मतदान पार पडले.
माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी १९४५ मध्ये स्थापन झालेल्या या पतपेढीचे दर पाच वर्षांनी निवडणूक होते. गेली ७६ वर्षे एकाच विचाराच्या पॅनेलची सत्ता होती. यंदा प्रथमच सत्तापालट होत माजी आमदार मोहन जोशी, शिवाजी खांडेकर, महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे सचिव प्रसाद आबनावे, नरेंद्र नागपुरे, प्रथमेश आबनावे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आपले विकास पॅनल’ने एकतर्फी विजय मिळवला आहे.
सुभाष ताकवले, विठ्ठल भरेकर, विठ्ठल रणसूर, हरिश्चंद्र गायकवाड, अरुण कामठे, शशिकांत शिंदे, सचिन दुर्गाडे, विद्या पवार, संजीव यादव, राजेंद्र गाढवे, बापूसाहेब पवार, सुजित जगताप, प्रसन्न कोतुळकर, विनोद गोरे यांनी मेहनत घेतली. पॅनेलला मुख्यतः शिक्षक लोकशाही आघाडी, मुख्याध्यापक संघ, पुणे जिल्हा शिक्षकेतर संघटना, कलाशिक्षक संघ, शारीरिक शिक्षण संघासह शहरातील प्रमुख संघटनांनी पाठिंबा दिला होता. दिवंगत डॉ. विकास आबनावे यांच्या स्मृतींना वंदन म्हणून ‘आपले विकास पॅनल’ या नावाने यंदा पॅनल उतरवण्यात आले.
‘आपले विकास पॅनल’चे विजयी शिलेदारधोंडिबा तरटे, डॉ. कल्याण वाघ, महादेव माने, डॉ. मंगल शिंदे, हर्षा पिसाळ, दत्तात्रय हेगडकर, संदीप घोलप, संजय लोंढे, शिवाजी कामथे, राज मुजावर, पुष्पक कांदळकर, दत्तात्रय नाईक, विजय कचरे यांनी या निवडणुकीत विजय मिळवत संचालपदी विराजमान होण्याचा मान मिळवला.