रसिकांच्या पाठबळावर रंगभूमीवर कायम कार्यरत राहण्याची इच्छा : पुष्कर श्रोत्री

Date:

नाट्य परिषदेच्या पुणे शाखेतर्फे पुष्कर श्रोत्री यांचा नटवर्य केशवराव दाते स्मृती पुरस्काराने गौरव

पुणे : मी गेली अनेक वर्षे मराठी रंगभूमीवर कार्यरत आहे. माझे पाय कायम या रंगभूमीला लागले असावेत. त्यातूनच एखादेतरी मराठी नाटक करण्याकडे माझा कल असतो. मला कायम रंगभूमीवर कार्य करण्याची इच्छा आहे, यासाठी रसिकांचे बळ, सदिच्छा, पाठींबा सातत्याने लाभावा, अशी इच्छा प्रसिद्ध अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी व्यक्त केली. चित्रपट व नाट्यसृष्टीत प्रदीर्घ काळ सेवा करणाऱ्या केशवराव दाते यांच्या नावे मिळालेला पुरस्कार माझ्यासाठी वंदनीय आहे, अशा कृतार्थतेच्या भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पुणे शाखेच्या ४८व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नटवर्य केशवराव दाते स्मृती पुरस्काराने पुष्कर श्रोत्री यांचा गौरव करण्यात आला त्या वेळी सत्काराला उत्तर देतान श्रोत्री बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, अभिनेत्री प्रिया बेर्डे, भरत नाट्य मंदिरचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे, सूर्यदत्ता एज्युकेशन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया, नाट्य परिषद कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, उपाध्यक्ष विजय पटवर्धन, शोभा कुलकर्णी, प्रमुख कार्यवाह दीपक रेगे, कोषाध्यक्ष अशोक जाधव, शिरूर शाखेच्या अध्यक्ष दिपाली शेळके, हडपसर शाखेचे अध्यक्ष प्रमोद रणनवरे मंचावर होते. बालगंधर्व रंगमंदिर येथे सोमवारी (दि. २५) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कै. माणिक वर्मा स्मृती पुरस्कार सौ. सुनीता गुणे यांचा, कै. बबनराव गोखले अखंड नाट्यसेवा पुरस्काराने वसंत भडके यांचा तर कै. भार्गवराम आचरेकर स्मृती पुरस्काराने प्रदीपकुमार कांबळे यांचा गौरव करण्यात आला. विराजस कुलकर्णी, राज कुबेर, स्वप्नील कुलकर्णी, निरंजन कुलकर्णी, ओंकार खाडिलकर, मयूर आडागळे, विश्वास पांगारकर, आनंद जोशी, दत्तात्रय गाडेकर, सुशील भोसले, दिलीप वाघमारे, राहुल भालेराव, आशा मुसळे, हेमांगी काळे-गरुड, दशरथ पाचरणे, अक्षया देवधर, सावनी दातार यांचा सत्कार प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, शशिकांत कोठावळे यांच्या हस्ते करण्यात आला.

स्वर्गीय लक्ष्मीकांत बेर्डे यांना अभिवादन करणारा ‘आठवणीतला लक्ष्या!’ हा विशेष कार्यक्रम पुण्यातील कलाकारांनी सादर करत कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमाची संकल्पना चेतन चावडा आणि जतीन पांडे यांची होती.

‘इतिहास रंगभूमीचा’ उपक्रमासाठी मसापचे सहकार्य : योगेश सोमण….

योगेश सोमण म्हणाले, योग्य वयात मिळालेला पुरस्कार कलाकारासाठी त्याने केलेल्या कार्याची पावती असते तसेच पुढे जोमात कार्य करण्यासाठी मिळालेली प्रेरणाही असते. नाट्य परिषेच्या माध्यमातून राबविला जाणारा ‘इतिहास रंगभूमीचा’ हा उपक्रम पुन्हा एकदा सुरू व्हावा ज्या योगे कलावंत, साहित्यिक, लेखक यांच्या कार्याचा इतिहास जीवंत ठेवता येईल आणि त्याचे दस्तावेजीकरण होईल, या करीता महाराष्ट्र साहित्य परिषदेचे संपूर्ण सहकार्य लाभेल. नाट्य परिषदेच्या सर्वच शाखा उत्तम कार्य करीत असून ज्येष्ठ तसेच नवोदित कलाकारांसाठी सातत्याने पुरस्कार देऊन त्यांना प्रोत्साहित करत आहेत.

पुणेकरांच्या प्रेमाची लक्ष्मीकांत यांना जाण होती : प्रिया बेर्डे…

प्रिया बेर्डे म्हणाल्या, मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीत लक्ष्मीकांत बेर्डे हे नाव मोठे असून त्यांच्या निधनाला २१ वर्षे झाल्यानंतरही रसिकांच्या प्रेमातून ते आपल्याच आहेत हे सातत्याने जाणवते. लक्ष्मीकांत बेर्डे हे पुणेकर रसिकांचे प्रेम जाणून होते. ते एक उत्तम माणूस व कलाकाराचे मूर्तीमंत उदाहारण होते. यशाच्या शिखरावर पोहोचूनही त्यांचे पाय जमिनीवरच असत. त्यांनी दुसऱ्याचा विनोद हडपण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. कारण ते अतिशय प्रतिभावन कलावंत होते. चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून नाटक, चित्रपट, मालिका कलावंतच नव्हे तर लोककलाकारांच्याही समस्या जाणून घेत कार्य व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

सांगीतिक कारकीर्द पुण्यात घडली : सुनीता गुणे….

सत्काराला उत्तर देताना सौ. सुनीता गुणे म्हणल्या, मी सांगलीची असले तरी माझी सांगीतिक कारकीर्द पुण्याने घडविली आहे. या क्षेत्रातील सेवा जाणून घेत नाट्य परिषदेतर्फे माणिक वर्मा यांच्या नावे दिला गेलेला पुरस्कार माझ्यासाठी मौल्यवान आहे.

परिषदेचे सर्वातोपरी सहकार्य : मेघराज राजेभोसले….

नाट्य परिषदेच्या सर्व शाखा उत्तम पद्धतीने कार्यरत आहेत. कला क्षेत्रात एकमेकांचा आदर करत सहकार्याने काम केल्यास उत्तम कार्य घडते. कलावंताला जगण्यासाठी कलेशिवाय दुसरे साधन उपलब्ध करून देण्यासाठी परिषद कार्यरत राहण्याचा प्रयत्न करेल, अशी ग्वाही मेघराज राजेभोसले यांनी प्रास्ताविकात दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शिवसेनेचा पुणे महानगरपालिकेवर आक्रमक हल्लाबोल मोर्चा..!!

संतप्त शिवसैनिक थेट पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर चढले, महापालिकेत शिरून...

कधीकाळी याचकाच्या भूमिकेत असलेल्या भारताची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल

मोदी सरकारच्या तपपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार 'राष्ट्र निर्माणाची...