एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर:केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची घेणार भेट

Date:

मुंबई- राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी अचानक दिल्ली दौऱ्यावर गेलेत. ते तिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. या भेटीचे नेमके कारण समजू शकले नाही, पण ही भेट विधान परिषदेच्या निवडणुकीतील जागावाटप व जागांची अदलाबदली या भोवती फिरती राहणार असल्याचा अंदाज आहे. विशेषतः ऑपरेशन टायगरवर या भेटीत चर्चा होईल काय? असाही प्रश्न या निमित्ताने चर्चिला जात आहे.

विधान परिषदेच्या 17 जागांसाठी येत्या 18 जून रोजी निवडणूक होणार आहे. त्यात सत्ताधारी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे. या फॉर्म्युल्यानुसार, भाजप सर्वाधिक 12 जागांवर निवडणूक लढवेल. तर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला अनुक्रमे 3 व 2 जागांवर समाधान मानावे लागेल. पण महायुतीत 1-2 जागांवर वाद सुरू असल्याची माहिती आहे. शिंदे गटाने विधान परिषदेच्या 6 जागांची मागणी केली आहे. पण भाजपने त्यांना केवळ 4 जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपल्या पक्षाचे गाऱ्हाणे मांडणार आहेत.

विधान परिषदेच्या जागावाटपाच्या मुद्यावर राज्यात तोडगा निघण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन भाजपश्रेष्ठींची भेट घेण्यास प्राधान्य दिले आहे. अमित शहांसोबतच्या बैठकीत शिंदे पक्ष विस्ताराच्या मुद्यावर अर्थात ‘ऑपरेशन टायगर’वरही चर्चा करण्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप व शिवसेनेमध्ये बहुतांश जागांवर मतैक्य झाले आहे. पण ठाण्याच्या जागेवर घोडे अडले आहे. भाजप या जागेसाठी आग्रही आहे. तर शिवसेनेने ठाणे आपला बालेकिल्ला असल्याचे सांगत त्यावरील दावा सोडण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पेच फसला आहे. शिंदे गटाने या प्रकरणी जागांची अदलाबदली करण्याचा आग्रह धरला आहे.

भाजपने ठाणे विधान परिषदेच्या जागेवर जोरदार दावा केला आहे. या ठिकाणी भाजप नगरसेवकांचे संख्याबळ जास्त असल्यामुळे ही जागा भाजपलाच मिळावी, असा आग्रह भाजप आमदार संजय केळकर यांनी धरला आहे. ठाण्यात सध्या भाजपचे 444 नगरसेवक आहेत. त्या तुलनेत शिवसेना व जिजाऊ संस्थेकडे केवळ 346 सदस्य आहेत. महायुतीच्या चर्चेत भाजपची भूमिका मजबूत आहे. भाजप या ठिकाणी ठाण्याचाच उमेदवार देईल, असे ते म्हणालेत. संजय केळकर यांच्या या भूमिकेला साजेशी भूमिका भाजपच्या राज्य नेतृत्वाने घेतल्यामुळे या जागेवरून महायुतीत फटाके फुटण्याची शक्यता आहे.

भाजप नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी सकाळी एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. त्यानंतर ते म्हणाले होते, सध्या ज्या पक्षाकडे जागा आहे, ती त्यांनाच देण्याचा विचार सुरू आहे. त्यानंतर संख्याबळानुसार निर्णय घेतला जाणार आहे. विधानसभा व लोकसभा निवडणुकीवेळीही हाच फॉर्म्युला वापरण्यात आला होता. पण आता एकनाथ शिंदे यांनी दिल्लीला गेल्यामुळे जागावाटपाचा निर्णय आता दिल्लीतच होणार असल्याची माहिती आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई.दि.२४: राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य आणि...

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांना सलग दुसऱ्यांदा संसदरत्न पुरस्कार

संसदेतील सर्वोत्तम कामगिरीचा सलग दुसऱ्या वर्षी गौरव पुणे: संसदेतील सर्वोत्तम...

सर्वधर्मसमभाव हाच खरा राष्ट्रवाद – विजय तांबे

फुले, गांधी, नेहरू विचारमंच आयोजित "महात्मा गांधी आणि राष्ट्रवाद"...

केशवनगर-खराडी रखडलेल्या पुलाचे काम 20 दिवसात झाले नाही तर…नगरसेवक अजित घुलेंचा इशारा

पुणे- केशवनगर-खराडी रखडलेल्या पुलाच्या कामासाठी २० दिवसांची मुदत देत...