पुणे- पुण्यातील तरुणाई किती खतरनाक मार्गावरून जीवन प्रवास करतेय याबाबत हल्ली काही वर्षांपासून नेहमीच चर्चा होतेय, अगदी याच अनुषंगाने काल वनराज आंदेकर च्या हत्येचा बदला घेण्यासाठी अक्षय म्हस्केवर गोळीबार आणि कोयत्याने वार करत खुनी हल्ला केलेल्या आरोपींची पुष्टी होते आहे. पोलिसांनी सहजांना या हल्ल्याच्या प्रकरणी पकडले आहे ज्यातील एक अल्पवयीन मुलगा आहे तर अन्य ५ जन १९ ते २५ वयोगटातील तरुण आहेत. ज्यांनी भर सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास गर्दीने गजबजलेल्या बालाजीनगर परिसरात हा खुनी हल्ला केला .
पोलिसांनी या संदर्भात सांगितले कि,’पुणे शहरातील राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी नगरसेवक वनराज सुर्यकांत आंदेकर याचे खुनाच्या गुन्ह्यामध्ये अटक असलेला आरोपी आकाश बापु म्हस्के याचा लहान भाऊ अक्षय उर्फ बाळु बापु म्हस्के, वय २६ वर्ष याचेवर पाळत ठेवुन त्याला जिवे ठार मारण्याचे उद्देशाने तो दिनांक २०/०५/२०२६ रोजी सकाळी १०.०० वा. चे सुमारास राजश्री शाहु बँक चौक, बालाजीनगर, धनकवडी, पुणे येथे रिक्षात बसलेला असताना त्याचेवर पिस्टलने फायर करुन तसेच धारधार हत्याराने वार करून गंभीर जखमी केले म्हणुन सहकारनगर पोलीस स्टेशन गु.र.नं. २०४/२०२६ भा.न्या.सं.क १०९, ६१ (२), १८९, १९०,१९१ (२) (३), ३(५) आर्म अॅक्ट क. ३ (२५), ४ (२५) व मपोॲक्ट ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्हयाच्या अनुषंगाने वरिष्ठांचे मागर्दशनाखाली गुन्हे शाखा, युनिट १ चे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित जाधव व त्यांचेकडील तपास पथक हे आरोपींचा शोध घेत असताना नमुद गुन्ह्यात ऋषिप्रसाद मोहन आंबट हा असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचे वडीलांच्याकडे चौकशी केली असता ऋषिप्रसाद हा नमुद गुन्ह्यातील इतर साथीदारांसह लोणावळा येथे असल्याची माहीती मिळाली.
युनिट-१ चे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित जाधव व युनिट-०१, गुन्हे शाखा कडील पोलीस अंमलदार असे लोणावळा तेथे जावुन आरोपीतांचा शोध घेत असताना आरोपी हे पुणे-मुंबई हायवे वरील बेहेरगाव, कार्ला, लोणावळा येथे एकविरा देवी कडे जाणारे रस्त्याचे कमानी जवळ येणार असल्याची खात्रीशीर गोपनीय माहीती मिळाल्याने तात्काळ बातमीचे ठिकाणी जावुन सापळा रचुन थांबले असताना गुन्ह्यातील आरोपीत आवेज आश्पाक शेख हा त्याचे साथिदारांसह तेथे आला असताना त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारता त्यांनी त्यांची नावे १) आवेज अशपाक शेख वय २६ वर्ष रा. २७१, गणेश पेठ, अजय सी फुड शेजारी, पुणे २) अमन फारुख बागवाले वय २१ वर्ष, रागोल्डनग्रेस, तळ मजला, भारत टॉकीज जवळ, भवानी पेठ, पुणे ३) वेदात श्रीनिवास टेमगिरे वय १९ वर्ष रा ६० भवानीपेठ, पालखी विठोबा चौक, पुणे ४) त्रह्मीप्रसाद मोहन आंबट वय २१ वर्ष रा. हमाल तालीमनाना पेठ, नवरंगमित्र मंडळा जवळ, पुणे ५) आफ्ताब शरिफ सय्यद, वय २२ वर्ष रा. भाग्योदय नगर, वैशाली नर्सिंग होम शेजारी, कोंढवा, खुर्द, पुणे व एक विधिसंघर्षग्रस्त बालक असल्याचे सांगितले. त्यांचेकडे अधिक तपास करता त्यांनी सदर गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. त्यांना ताब्यात घेऊन पुढील तपासाकरीता सहकारनगर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे.सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार,अपर पोलीस आयुक्त, प्रशासन (अति. कार्य. पोलीस सह आयुक्त) संजय पाटील, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे तेजस्विनी सातपुते, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे गौहर हसन, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-१, शैलेद्र संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनिट-१ गुन्हे शाखा अजित जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनिट-२ गुन्हे शाखा अश्विनी जगताप यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक राहुल मखरे पोलीस अंमलदार विनोद शिंदे, अनिकेत बाबर, शशिकांत दरेकर, हेमंत पेरणे, अमित जमदाडे, मयुर भोसले, सुहास डोगरे, निलेश साबळे, युवराज कांबळे, उमेश मठपती व अविनाश दळवी यांचे पथकाने केली आहे.

