नीट पेपरफुटी प्रकरण:मनीषा मांढरे निलंबित, मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राध्यापिकेवर संस्थेकडून कारवाई

Date:

पुणे-नीट २०२६ च्या प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात पुणे येथील मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राध्यापिका मनीषा गुरुनाथ मांढरे यांना अखेर संस्थेकडून निलंबित करण्यात आले आहे. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीने सोमवारी एका आपत्कालीन बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

प्राध्यापिका मांढरे या गेल्या २४ वर्षांपासून मॉडर्न महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागात जीवशास्त्र विषयाच्या शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवामुळे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) त्यांची नियुक्ती नीट परीक्षेच्या गोपनीय कामासाठी केली होती.

संस्थेने स्पष्ट केले आहे की, या नियुक्तीचा महाविद्यालयाशी किंवा संस्थेशी कोणताही संबंध नव्हता. मांढरे आणि एनटीए यांच्यातील सर्व पत्रव्यवहार थेट सुरू होता.

शनिवार, १६ मे २०२६ रोजी मनीषा मांढरे यांना नीट पेपरफुटी प्रकरणात अटक झाल्याची माहिती समोर आल्यानंतर शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. या घटनेला अत्यंत गंभीर आणि निंदनीय मानत संस्थेच्या नियामक मंडळाने सोमवारी तातडीची बैठक बोलावली.
या बैठकीत महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी नियमावली १९८१ मधील नियम ३३ (५) नुसार त्यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली. हे निलंबन त्यांच्या अटकेच्या दिनांकापासून म्हणजेच १६ मे २०२६ पासून लागू करण्यात आले आहे.

या निर्णयाबाबत शिक्षण आयुक्त कार्यालय, शालेय शिक्षण विभाग आणि सहसंचालक कार्यालयाला अधिकृतपणे कळवण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची पुढील चौकशी आता सीबीआयच्या सहकार्याने करण्यात येणार असल्याचे संस्थेचे कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख, सहकार्यवाह प्रा. डॉ. ज्योत्स्ना एकबोटे आणि प्राचार्या प्रा. डॉ. निवेदिता एकबोटे यांनी स्पष्ट केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आदिवासी कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी वारली पेंटिंग कार्यशाळा

पुणे, दि. १८ : आदिवासी समाजातील वारली जमातीची...

NEET पेपरफुटी:RCC क्लासेसच्या शिवराज मोटेगावकरने 10 दिवस आधीच मिळवला होता पेपर: 9 दिवसांची CBI कोठडीत रवानगी

कोट्यवधींचे व्यवहार झाले, दहा लाख रुपये देऊन प्रश्नपत्रिका विकली...

नागरिकांनी आवश्यक औषधांचा साठा करून ठेवावा-अन्न व औषध प्रशासन विभागाचे आवाहन

पुणे, दि.१८: अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने त्यांच्या प्रलंबित...

कोरेगाव पार्क परिसरात धावत्या कारमध्ये महिलेवर बलात्कार: रविवारी मध्यरात्रीची घटना; लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अत्याचार

पुणे-लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका महिलेवर धावत्या कारमध्ये बलात्कार झाल्याची...