शेतकऱ्यांवर मोठा अन्याय:उत्पादन खर्च 20 रुपये अन् खरेदी दर फक्त साडेबारा रुपये: रोहित पवार आक्रमक

Date:

नाशिक: केंद्र सरकारने कांद्याची खरेदी प्रतिक्विंटल 1235 रुपये (12 रुपये 35 पैसे प्रतिकिलो) या अत्यंत तोकड्या दराने करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा खरेदी दर अत्यंत अपुरा असल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने केंद्र सरकारच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून सरकारवर जोरदार टीका केली आहे. अशातच राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे लासलगाव येथे दाखल झाले असून ते शेतकऱ्यांशी संवाद साधून पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच शेतकऱ्यांवर अन्याय सुरू असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

रोहित पवार म्हणाले, आज जो शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे तो अन्याय कमी झाला पाहिजे आणि न्याय मिळाला पाहिजे. आज शेतकऱ्यांनी स्वतः कष्टाने पिकवलेला कांदा आहे त्याला कुठे तरी 3 रुपये, 4 रुपये, 5 रुपये काही शेतकऱ्यांना तर एक रुपया अशा पद्धतीने भाव मिळत असेल आणि उत्पादनाचा खर्च हा कमीत कमी 20 रुपये किलो पेक्षा जास्त आहे.
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, असे असताना काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले की आम्ही साडे 12 रुपयांनी कांदा खरेदी करू तो सुद्धा 2 लाख टन. म्हणजे रब्बीचा कांदा जर आपण पाहिला तर 70 लाख टन कांदा बनतो आणि हे 2 लाख टन तुम्ही घेणार आणि नाफेडकडून घेणार तर घेणार तुम्ही डायरेक्ट दिल्ली आणि मार्केटला जाऊन विकणार. तर उद्या जाऊन जे रेट वाढणार आहेत ते सुद्धा रेट आमच्या शेतकऱ्यांचे वाढणार नाहीत. त्यामुळे इथे आज शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आलो आहोत आणि त्यांच्यासोबत चर्चा करून पुढे काय करायचे याचा निर्णय घेणार आहोत. मात्र, आज अतिशय वाईट परिस्थिती आहे.

लासलगाव जे महाराष्ट्रातील ठराविक जे मोठे मार्केट कमिटी आहे त्यातली एक आहे. त्यामुळे इथे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने आपला कांदा घेऊन येत असतो. त्यामुळे इथे शेतकरी मोठ्या संख्येने आलेले आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधून पुढे काय करायचे हे आम्ही ठरवणार आहोत, असे रोहित पवारांनी स्पष्ट केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

देशभर पावसाचा कहर; वसईत रस्त्याला नदीचे रूप, २० कार पाण्याखाली

गुजरातमध्ये कॉलनीत चालली बोट; १३ राज्यांना मुसळधार पाऊस आणि...

भारत–जपान तंत्रज्ञान सहकार्याला पुण्यात नवी गती; पुढील पाच वर्षांत १,००० हून अधिक आयटी रोजगारांची संधी

पुणे | प्रतिनिधी पुणे शहर भारत–जपान तंत्रज्ञान सहकार्याचे महत्त्वपूर्ण केंद्र...

पावसाळी गटारे म्हणजे शहराची जीवनवाहिनी… ती बंद झाली की रस्तेच बनतात तलाव!

ऑपरेशन पावसाळी गटारे – भाग २ ड्रेनेज वेगळे... पावसाळी गटारे...