मुंबई, दि. 10 : जिल्हा प्राणिक्लेश प्रतिबंधक समिती, मुंबई उपनगर व शहर येथे शासन अधिसूचना 14 मार्च 2017 नुसार अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी प्रस्ताव आमंत्रित करण्यात येत आहेत.
प्राणी कल्याणाकरिता कार्यरत नागरिकांनी अशासकीय सदस्य पदाकरिता प्राणी कल्याणाविषयी केलेल्या कामकाजाच्या माहितीसह डॉ. शैलेश पेठे, उपआयुक्त पशुसंवर्धन, तथा, सदस्य सचिव, जिल्हा प्राणिक्लेश प्रतिबंधक सोसायटी, आरे, गोरेगाव, मुंबई-६५ यांच्याकडे दिनांक २५ ऑगस्ट २०२३ पर्यंत अर्ज करावे.
इच्छुकांनी इच्छापत्र, अर्ज, फोटो, आधारकार्ड, पोलिसांकडून प्राप्त चारित्र्य प्रमाणपत्र सादर करावे. तसेच आवश्यकतेनुसार कागदपत्रे सादर करावीत, असे डॉ शैलेश पेठे सदस्य सचिव यांनी कळविले आहे.