• अतुलनीय विश्वास असलेला भारताचा क्रमांक 1* 3-व्हीलर ईव्ही ब्रँड: 50000 हून अधिक e-Alfa ग्राहकांचा विश्वास.
• अधिकच्या कमाईसाठी 20% इतका वाढीव पल्ला: एका चार्जवर 95+ किलोमीटर.
• व्यापक चार्जिंग इकोसिस्टम: उच्च क्षमता असलेला 18 A चार्जर व देशभरात 10000+ चार्जिंग स्टेशन्सची सुविधा.
• व्यापक वॉरंटी: एक वर्षाची वाहनाची वॉरंटी आणि 18 महिन्यांची बॅटरीची वॉरंटी.
• सर्वांत भव्य सर्व्हिस नेटवर्क: उत्कृष्ट ग्राहकांच्या सहाय्यासाठी भारतभरात 1150 हून अधिक Mahindra touchpoints.
• चालकाला 10 लाख रुपयांचा मोफत अपघाती विमा: सुरक्षा व सुरक्षिततेची निश्चिती
मुंबई, 9 ऑगस्ट 2023: Mahindra Last Mile Mobility(LMM) या भारतातील नंबर 1* इलेक्ट्रिक 3-व्हीलर कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर लाइन अपमध्ये महिंद्रा e-Alfa Super बाजारात आणून भर घातली आहे. Mahindra ब्रँडची विश्वसनियता लाभलेली ही नवीन ई-रिक्षा तिची दूरचा पल्ला गाठण्याची क्षमता, तिच्या श्रेणीतील सर्वोत्तम सुरक्षा आणि सुविधाजनक वैशिष्ट्यांमुळे चालक सहकाऱ्यांसाठी सर्वोत्तम स्वयंरोजगार पर्याय म्हणून कायम राहील.
या e-Alfa Super च्या प्रमुख वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे Mahindra द्वारे व्यापक ड्रायव्हिंग व्हॅलिडेशनद्वारे प्राप्त केलेली तिची एका चार्जवर 95+ किलोमीटरचा पल्ला गाठण्याची क्षमता; यामुळे चालकांना जास्तीत जास्त कमाई करता येते. 140 Ah लीड-एसिड बॅटरीमुळे e-Alfa Super पूर्वीपेक्षा 20% जास्त इतका एक प्रमाणित पल्ला गाठते. हिची मोटर 1.64 kW पीक पॉवर आणि 22 Nm टॉर्क तयार करते, त्यामुळे ही दमदार कामगिरी करते.
50000 पेक्षा जास्त e-Alfa ग्राहकांच्या विश्वासाच्या बळावर e-Alfa Super रोजच्या धकाधकीच्या वापरासाठी तयार केलेली आहे. हिच्या मालकाचा अनुभव समृद्ध करण्यासाठी Mahindra वाहन खरेदी करताना .चालकासाठी 10 लाख रुपयांचा मोफत अपघाती विमादेखील देत आहे, जेणेकरून हिच्या ग्राहकांची सुरक्षा आणि सुरक्षितता सुनिश्चित होईल.
Mahindra Last Mile Mobility चे मुख्य कार्यकारी अधिकारी(CEO) सुमन मिश्रा म्हणाले, ” पर्यावरणपूरक वाहनांची वाढती मागणी असलेल्या जगात आमची e-Alfa Super रिक्षा अधिक पल्ला आणि कमाईची क्षमता देते. यामुळे आमच्या चालक सहकाऱ्यांना Mahindra ब्रँडच्या विश्वास आणि भरवश्याचे बळ मिळून त्यांचे उद्योगातील उत्पन्न वाढविण्यास आणि पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम कमी करण्याची संधी मिळते.”
e-Alfa Super बरोबर एक उत्कृष्ट 18 A चार्जर मिळतो. त्याची 12 महिन्यांची वॉरंटी असते आणि तो अधिक वेगाने चार्जिंग करतो; त्यामुळे चालकांना डाउनटाइम(अनुत्पादक काळ) कमी करून आपली उत्पादकता जास्तीत
जास्त करण्याची संधी मिळते. आमच्या चार्जिंग सेवा देणाऱ्या सहकाऱ्यांच्या मदतीने, Mahindra 3-व्हीलर EV ग्राहकांसाठी देशभरात 10000 पेक्षा अधिक चार्जिंग स्टेशन्सदेखील उपलब्ध आहेत.
Mahindra या वाहनासाठी व्यापक कव्हरेजसह एक वर्षाची वॉरंटी देते. तसेच, हिच्या बॅटरीसाठी 18 महिन्यांची वॉरंटी आहे. ही दीर्घकालीन विश्वसनीयता आणि ग्राहकांच्या समाधानाची हमी देते. भारतातील 1150 हून अधिक Mahindra touchpoints मध्ये या वाहनाची देखभाल केली जाऊ शकते.
मेटल बॉडी असलेल्या e-Alfa Super मध्ये प्रगत ब्रेकिंग सिस्टम आणि छताला बसविलेल्या ग्रॅब हँडलसह हिच्या श्रेणीतील सर्वोत्तम सुरक्षाविषयक वैशिष्ट्ये दिली आहेत. हिची किंमत ₹ 1.77 लाख असून, ही एक्स-शोरूम आणि त्या-त्या राज्यातील स्थानिक सरकारच्या ई-रिक्षांसाठीच्या मान्यतेनुसार उपलब्ध आहे.