पुणे : कामगारांच्या मूलभूत प्रश्नांसह विविध सामाजिक कार्यात हिरीरीने सहभागी होणाऱ्या किर्लोस्कर कमिन्स एम्प्लॉईज युनियनचा ५२ वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. वर्धापन दिनाच्या निमित्ताने कामगार नेते, राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत भोसले यांचे कामगारांसाठी विशेष मार्गदर्शन सत्र आयोजिले आहे.
बुधवार, दि. ९ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजता किर्लोस्कर कमिन्स एम्प्लॉईज युनियन सभागृह, लेन नंबर ३, डहाणूकर कॉलनी, कोथरूड, पुणे येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी सेवानिवृत्त कामगारांचा सत्कार, सेवेची २५ वर्षे पूर्ण करणाऱ्या कामगारांचा सत्कार आणि विशेष प्राविण्य पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत, असे युनियनच्या वतीने कळवण्यात आले आहे.