गावातली सरपंचाची मुलगी स्वतःच्या बालमैत्रीणीच्या प्रेमात पडते इतकंच नाही आपलं हे नातं जगासमोर जाहीर करून मानाने जगायचं ठरवते, तेव्हा गावामध्ये जो काही हलकल्लोळ माजतो आणि त्यात गावामध्ये निवडणूका येतात आणि त्याचा सर्वच जण राजकीय फायदा घ्यायचा प्रयत्न करतात अशी आगळी वेगळी ऑडिओ कादंबरी नितीन थोरात लिखित पेटलेलं मोरपीस पाच वर्षांपूर्वी स्टोरीटेलवर सादर झाली होती प्रसिध्द अभिनेत्री आणि सध्याची आघाडीची यूट्यूबर उर्मिला निंबाळकर यांच्या आवाजात. ही ऑडिओ कादंबरी स्टोरीटेलवर सर्वाधिक गाजली त्यामुळे त्याचा दुसरा सिझनही दोन वर्षापूर्वी रिलीज करण्यात आला आणि या आठवड्यात याच कादंबरीचा तिसरा सिझन प्रकाशित झाला आहे. खूप गाजलेल्या वेब सिरीजचे अनेक सिझन ओटीटी प्लॅटफॅार्मवर येत राहतात पण ऑडिओ बुकचेही असे सिझन त्याच्या लोकप्रियतेमुळे येत आहेत.
या दोघींची प्रेमकहाणी इतकी उत्कट आहे की आपण त्यात इतके गुंतत जातो आणि विसरून जातो की त्या दोघीही मुली आहेत, त्यांचे संबंध समलैंगिक आहेत. म्हणजे ख-या अर्थाने लिंगभेदाच्याही पुढे जाणारी ही प्रेमकथा आहे जी आपल्याला फक्त माणूस म्हणून विचार करायला भाग पाडते. मी स्वतःला भाग्यवान समजते की इतक्या उत्तम कादंबरीचा आवाज मला होता आला. मी स्वतः पश्चिम महाराष्ट्रातली असून माझं नववीपर्यंतच शालेय शिक्षण गावात झालं, त्यामुळे ग्रामीण लहेजा खूप चांगल्या प्रकारे पकडता येतो. या कथेतली दोन मुख्य पात्र सोनी आणि माधी रंगवताना खूपच मजा आली. मला आजही सोशल मिडीयावर अनेक मेसेज येतात की ही कादंबरी आम्ही सलग ऐकली म्हणून आणि त्याचा मला खूप आनंद वाटतो. वेब सिरीजसारखं बिंज लिसनींग करून लोकं कथा संपवत आहेत त्यावरूनच त्याच्या लिखाणाची ताकद समजून येते. असं उर्मिला निंबाळकर सांगते.
पेटलेलं मोरपीस या कादंबरीच्या तिनही सिझनचं लिखाण प्रसिध्द लेखक नितीन थोरात यांनी केले आहे. नितीन थोरात यांनी आत्तापर्यंत 17 कादंब-यांचे लिखाण केले असून त्यांची पहिली कादंबरी सूर्याची सावली याला राज्यशासनाचा लेखनाचा पुरस्कार मिळाला होता. त्याचबरोबर त्यांचीच नुकतीच प्रकाशित झालेली खंडोबा कादंबरीही विशेष गाजली. नितीन थोरात यांनी स्टोरीटेलवर सात ओडीओ कादंब-या आणि अनेक ऑडिओ लघुकथांचे लेखन केले आहे. स्टोरीटेलवरच्या मराठी लेखकांमध्ये सर्वाधिक ऐकल्या गेलेल्या टॅाप टेन लेखकांच्या यादीतही ते आहेत. पेटलेलं मोरपीसचा तिसरा सिझनही पहिल्या दोन सिझन सारखा श्रोत्यांच्या पसंतीस पडेल असे नितीन थोरात सांगतो.
पेटलेलं मोरपीस ही प्रचंड लोकप्रिय ऑडीओबुक्स ऐकण्यासाठी खालील लिंक
https://www.storytel.com/in/books/petlela-morpis-se03e01-2531061