पुणे-मागील वर्षी पुण्यात किडनी रॅकेट सक्रिय असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये हे रॅकेट सक्रिय असल्याचे चर्चा होती. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची आता पुन्हा एकदा सखोल चौकशी करण्यात येणार आहे. यासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून चौकशी समिती नेमण्यात आली आहे.
या समितीच्या अध्यक्षपदी उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश चंद्रकांत भडंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तर या समितीत पोलीस दलातील काही वरिष्ठ अधिकारी आणि अवयव प्रत्यारोपणातील तज्ञांचा समावेश असणार आहे.तीन महिन्यात ही समिती आपला अहवाल सादर करेल अशी अपेक्षा आहे.
रुबी हॉस्पिटल मधील किडनी रॅकेट प्रकरणी रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर परवेज ग्रांट यांच्यासह तज्ञ डॉक्टरांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.दरम्यान या सर्व आरोपांची सखोल चौकशी करून त्याबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल ही चौकशी समिती सादर करणार आहे.
तसेच चौकशी दरम्यान काही अनियमितता आढळून आल्यास त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कोणत्या उपाययोजना करणे गरजेचे आहे याची शिफारसही ही समिती करणार (Pune) आहे.