IMDb यादीत तमन्ना भाटिया ठरली अव्वल !
तमन्ना भाटिया हिच्या दोन रिलीज नंतर तिने तिच्या कामात अव्वल ठरली आहे. जी करदा आणि लस्ट स्टोरीज 2 च्या यशाने उंच भरारी घेतली असून तिच्या तामिळ चित्रपट जेलर मधलं कावला हे गाणं नुकतंच आल आणि या गाण्याने प्रेक्षकांची मने जिंकली. या गाण्यात तिच्यासोबत ओजी रजनीकांत देखील आहे. आता तमन्नाने आणखी एक पराक्रम केला आहे तो म्हणजे IMDb च्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत त्याने अव्वल स्थान पटकावले आहे.
https://www.instagram.com/p/CujCcNOylI4/?igshid=MzRlODBiNWFlZA
तमन्ना भाटियाने ‘बॉलिवुडचा किंग खान’ शाहरुख खानला मागे टाकले आहे जो या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिने मृणाल ठाकूर, कियारा अडवाणी, राम चरण, रणवीर सिंग आणि थलपथी विजय यांनाही मागे टाकून यादीत अव्वल स्थान मिळवले. एक अभिनेत्री म्हणून तिची अष्टपैलुत्व पुन्हा एकदा सगळ्यांना समजलं आहे.
तमन्ना तिच्या प्रवासात पुढे जात असताना तिच्या पुढच्या प्रवासात मल्याळममध्ये ‘बांद्रा’, ‘जेलर’ आणि ‘अरनमनाई 4’ तमिळमध्ये आणि ‘भोला शंकर हे चित्रपट करणार आहे.