पुणे : कसबा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. पोटनिवडणुकीसाठी अधिकारी आणि पोलीस चेक पोस्टवर गाड्यांची तपासणी करत आहेत. गाड्यांची तपासणी करत असताना एका गाडीत पाच लाख रुपयांची रोकड सापडली आहे. यानंतर तातडीने स्वारगेट पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी ही रक्कम जप्त केली आहे. पोलिसांनी गाडी आणि वाहन चालक यांना ताब्यात घेतले आहे. हे पैसे कशासाठीवापरले जाणार होते, याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. मात्र पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस सतर्क झाल्याचे पाहायला मिळत आहे.कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात येत्या 26 फेब्रुवारी रोजी पोटनिवडणूक होत आहे. या दोन्ही ठिकाणी भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होत आहे. त्यातच बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सात तास बैठका घेतल्या. त्यामुळे दोन्ही ठिकाणी भाजप विजयासाठी जोरदार प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. यासर्व घडामोडीदरम्यान कसबा निवडणुकीच्या प्रचारात पोलिसांनी पाच लाखाची रोकड जप्त केली आहे.जप्त केलेल्या रकमेबाबत निवडणूक अधिकारी स्वारगेट पोलीस ठाण्यात चौकशी करत आहेत.ज्या गाडीमध्ये ही रक्कम आढळून आली त्या गाडी चालकाकडे पोलीस कसून चौकशी करत आहेत.
परंतु चालकाकडून योग्य उत्तर मिळत नसल्याने ही रक्कम निवडणुकीसाठीच असल्याचा संशय व्यक्त केला जात