पुणे- आजारी असलेले खासदार गिरीश बापट यांना भाजपाने त्यांच्या असहायतेचा , आजारपणाचा प्रकृतीचा कोणताही विचार न करता प्रचारासाठी वापर करणे म्हणजे राजकीय स्वार्थासाठी, सत्ते साठी भाजप काहीही करते त्यास कार्यकर्त्याच्या जीवाशी काही देणे घेणे उरत नाही हेच आज दिसून आले आहे अशी टीका कॉंग्रेसचे नेते माजी आमदार मोहन जोशी यांनी केली आहे. आज अखेरीस आजारी अस्तनाही खासदार बापट यांना भाजपाने प्रचारात उतरविल्यानंतर मोहन जोशी यांनी हि प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाला पराभव दिसू लागल्याने स्वार्थापायी भाजपने अवघ्या एका पोट निवडणुकीसाठी कार्यकर्त्याच्या जीवाचे असे हाल करावेत हे योग्य नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
नेमके मोहन जोशी काय म्हणाले ते ऐका त्यांच्याच शब्दात ….