पुणे- पंतप्रधान आवास योजनेतील भोसरी पेठ क्रमांक १२ मधील ४८०० घरांची योजना PMRDA ने पूर्ण करून आज पासून ताबे देण्यास प्रारंभ केला आहे. आज पहिल्याच दिवशी २३४ जणांनी घरांचा ताबा घेतला .या संदर्भात उप जिल्हाधिकारी आणि PMRDA अधिकारी रामदास तांबे यांनी सांगितले कि जमीन व मालमत्ता विभागाचे सह आयुक्त बन्सी गवळी यांनी कळविले आहे कि ,पेठ क्र. 12 गृहप्रकल्पातील EWS आणि LIG गटातील सदनिकांची ताबा प्रक्रीया दि. 06/06/2023 पासून सुरु करण्यात आली. यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे पोर्टलवर दि. 06/06/2023 ते दि. 19/06/2023 पर्यंतचा ताब्याचा कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार इमारतनिहाय ताबा देण्याची प्रक्रीया आज दि. 06/06/2023 रोजी सुरु करण्यात आली. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे EWS सदनिकांसाठी 8 पथके आणि LIG सदनिकांसाठी 2 पथके तयार करण्यात आली आहे. प्रत्येक पथकामध्ये 3 कर्मचारी असून सकाळी 9.00 ते दुपारी 1.00 या कालावधीत 1 ते 6 मजल्यावरील आणि दुपारी 2.00 ते सायं. 5.00 या कालावधीत 7 ते 11 मजल्यावरील सदनिकांचा ताबा देण्याचे नियोजन आहे.
ताबा घेतेवेळी लाभार्थ्यांनी सदनिकेचे अंतिम वाटपपत्र व आधारकार्डची मूळ प्रत इ. कागदपत्रे सोबत घेऊन येणेचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ताबा हा सदनिकेच्या मूळ अर्जदारास देण्यात येणार आहे. मूळ अर्जदार हा सदनिकेचा ताबा घेण्यास काही अपरिहार्य कारणास्तव उपस्थित राहू शकत नसल्यास सह अर्जदार यांच्या नावाने नोंदणीकृत Power of Attorney करुन दिली असल्यास सह अर्जदारास सदनिकेचा ताबा देता येईल.
सुधारीत वेळापत्रकानुसार लाभार्थी हे सदनिकेचा ताबा घेण्यास हजर न राहील्यास अशा लाभार्थ्यांना दि. 19/06/2023 नंतर ताबा देण्याची स्वतंत्रपणे व्यवस्था करणेत येईल.
आज पहिल्या दिवशी EWS गटातील 182 आणि LIG गटातील 52 अशा एकूण 234 सदनिकांचे ताबे देण्याची प्रक्रीया सुरळीतपणे पार पडल्याची माहिती बन्सी गवळी, सह आयुक्त यांनी दिली आहे. .