पुणे- 65 मी. रुंदीच्या संपुर्ण 88.08 कि.मी. चा रिंग रोडसाठी आवश्यक 46.8363 हेक्टर वनजमीन संपादनाचा प्रस्ताव वनविभागाच्या परिवेष या पोर्टलवर दि.31/05/2023 रोजी अपलोड करण्यात आला असून प्रस्ताव उपवनसंरक्षक, पुणे वन विभाग पुणे यांचेकडे दि.02/06/2023 रोजी सादर करण्यात आला.संपादित करावयाच्या सुमारे ४७ हेक्टर वनजमिनीसाठी पर्यायी वनेतर क्षेत्र देणेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयास विनंती करण्यात आली असुन पर्यायी जागेचा तपशील उपलब्ध झालेवर वनविभागासाठी चर्चा करुन पर्यायी जागा देण्यात येईल.अशी माहिती उप जिल्हाधिकारी तथा PMRDA चे अधिकारी रामदास जगताप यांनी येथे दिली आहे.
ते म्हणाले,’ प्राधिकरण हद्दीतील 110 मी. रुंद रिंगरोडच्या 128.08 कि.मी. लांबीपैकी मौजे परंदवाडी ता. मावळ ते मौजे सोळू ता.खेड ही 40 कि.मी. लांबीचा रिंगरोड महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास विकसनासाठी हस्तांतर करण्यात आला आहे. प्राधिकरणाकडील उर्वरित लांबीसाठी रस्त्याची रुंदी 65 मी. करण्याचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला होता. त्यांस अनुसरुन महाराष्ट्र शासनाची नगररचना अधिनियमानुसार कलम 20(3) ची अधिसुचना दि.18/11/2021 रोजी प्रसिद्ध झाली असुन पुढील कार्यवाही नगर रचना विभाग पुणे मार्फत सुरु आहे. त्याप्रमाणे प्राधिकरणाच्या ऑगस्ट 2021 मधील प्रसिद्ध प्रारुप विकास आराखड्यात प्राधिकरणाकडील रिंगरोडची रुंदी 65 मीटर दर्शविण्यात आली आहे.
65 मीटर रुंद रिंगरोड प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल व भूसंपादन प्रस्ताव सल्लागारामार्फत तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. पहिल्या टप्प्यासाठी मौजे सोलू, निरगुडी व वडगांव शिंदे या तीन गावांचे भूसंपादन प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात आले आहेत. तथापि 65 मी. रुंदीच्या संपुर्ण 88.08 कि.मी. चा रिंग रोडसाठी आवश्यक 46.8363 हेक्टर वनजमीन संपादनाचा प्रस्ताव वनविभागाच्या परिवेष या पोर्टलवर दि.31/05/2023 रोजी अपलोड करण्यात आला असून प्रस्ताव उपवनसंरक्षक, पुणे वन विभाग पुणे यांचेकडे दि.02/06/2023 रोजी सादर करण्यात आला.
संपादित करावयाच्या सुमारे ४७ हेक्टर वनजमिनीसाठी पर्यायी वनेतर क्षेत्र देणेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयास विनंती करण्यात आली असुन पर्यायी जागेचा तपशील उपलब्ध झालेवर वनविभागासाठी चर्चा करुन पर्यायी जागा देण्यात येईल.