पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ओडिसा येथे झालेल्या भयानक रेल्वे अपघातातील मृत पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली आणि शोकसभा.
पुणे- ओरिसा येथील बालासोर येथे तीन रेल्वे गाड्या एकमेकांवर आदळून २८८ लोकांचा मृत्यू झाला आणि हजर एक लोक जखमी झाले हि दुर्घटना केंद्र सरकारच्या आणि रेल्वे मंत्रालयाच्या निष्क्रीयतेमुळे च घडली असा आरोप काल शहर कॉंग्रेसच्या वतीने पुण्यातील कॉंग्रेस नेत्यांनी केला .
शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने फातिमा नगर येथील बिग बाजार चौका मध्ये तीन दिवसांपूर्वी ओडिशा येथे कोरोमंडल एक्स्प्रेस, माल गाडी आणि हावडा एक्स्प्रेस ह्या तिन्ही गाड्यांचा भयानक मोठा अपघात झाला. ह्या महाभयंकर अपघातामध्ये सरकारी आकडेवारी नुसार २८८ प्रवासी मृत्यु पावले, खरे तर ही आकडेवारी खरी आहे का खोटी हे सरकारच जाणे. ह्या अपघातामध्ये जे प्रवासी मृत्युमुखी पडले. त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेसने ही श्रद्धांजली सभा आयोजित केली होती. या श्रद्धांजली सभेच्या अध्यक्षस्थानी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे तसेच पक्षाचे सर्व पदाधिकारी नगरसेवक माजी मंत्री उपस्थित होते. ह्यावेळी श्रद्धांजली सभे मध्ये सर्व नेत्यांनीश्रद्धांजली वाहिली, या श्रद्धांजली सभेचे नियोजन माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, नगरसेवक अभिजीत शिवरकर, पुणे कॅन्टोन्मेंट ब्लॉकचे अध्यक्ष प्रदीप परदेशी यांनी केले होते.
या शोकसभेसाठी पुणे शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे माजी, मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी मंत्री रमेश बागवे, प्रदेश महासचिव अभय छाजेड, माजी महापौर कमल व्यवहारे,रजनी त्रिभुवन, नीता परदेशी,अविनाश बागवे, संगीता तिवारी, अजित दरेकर, ,सुजाता शेट्टी, लता राजगुरू, साहिल केदारी, मुक्तार शेख, प्रशांत सुरसे, मंजूर शेख, सीमा महाडिक, सीमा सावंत, सनी रणदिवे, विजय जाधव, द. स. पोळेकर, विनोद रणपिसे, सुनिल पंडित, रमेश सोनकांबळे, इरफान शेख, क्लेमंट लाजरस, नितीन वायदंडे, मुन्ना खंडेलवाल,सतिश पवार, रफिक शेख, तसेच पुणे शहर काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे श्रध्दांजली वाहताना म्हणाले की, ‘‘हा अपघात आहे की हत्या आहे. ह्या सरकारने हे बळी घेतले आहेत. तसेच रेल्वेचे बजेट कसे कमी केले ह्या सरकारने सिग्नल फेल्युअर रिपोर्ट आल्यावर ही गप्प बसले. निष्क्रियता दाखवली केंद्र सरकारने कॅग रिपोर्टवर रेल्वेमध्ये हजारोंची राहिलेली भरती सरकारने अजून केली नाहीये, रेल्वे ट्रॅक रिपेअर केलेले नाही. रेल्वे मेंटेनन्स अजिबात नाहीये यामुळे हा दुर्दैवी अपघात होऊन नागरिकांचा नाहक बळी गेला आहे.’’
यानंतर एक तिरंगा मेणबत्ती लावून सर्वांनी मेणबत्ती पेटवून अपघातातील मृत प्रवासी व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण केली आणि तसेच जे जखमी आहेत त्यांना देव लवकर बरे करो अशी प्रार्थना केली.