नवी दिल्ली- आमच्या मेडल्स ला १५/ १५ रुपयांचे म्हणवून हिणवणारे आता आमच्या नौकरीच्या मागे लागले आहेत पण आम्ही न्यायासाठी जीवनच पणाला लावले तिथे नौकरी काय ? ती १० सेकंदात सोडू , भीती दाखवणे सोडा असा स्पष्ट इशारा आंदोलक कुस्तीपटू नी दिला आहे.
भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधातील आंदोलनात सहभागी असलेले कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी रेल्वेतील नोकरी सोडण्याची धमकी दिली आहे. जर नोकरी न्यायाच्या मार्गात अडथळा ठरत असेल तर ती सोडायला आम्हाला 10 सेकंदही लागणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. नोकरीची भीती दाखवू नका.
साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगट सोमवारी त्यांच्या नोकरीवर परतले. तिघेही रेल्वेत काम करतात. तिघेही आजच ड्युटीवर रुजू झाले आहेत ड्युटीवर परतल्यानंतर बृजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करणार्या अल्पवयीन कुस्तीपटूने जबाब बदलला आहे. दाव्यानुसार, अल्पवयीन मुलीने दिल्लीच्या कॅनॉट प्लेस पोलिस स्टेशनमध्ये जबाब दिला आहे. यानंतर तिला पटियाला हाऊस कोर्टात नेण्यात आले, तिथे तिने जबाब मागे घेतला. या तिन्ही पैलवानांनीही आंदोलनातून आपली नावे मागे घेतली आहेत.