पुणे, 2 जून 2023
यंदा पुणे शहरामध्ये जी 20 परिषदेनिमित्त विविध देशांचे पाहुणे येणार आहेत त्या दृष्टिकोनातून पुणे महानगरपालिकेने शहराच्या सौंदर्यकरणाचे विविध उपक्रम हाती घेतलेले आहेत. या परिषदेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पुणे महापालिकेतर्फे पर्यावरण सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीचा आज महापालिका भवना पासून शुभारंभ झाला .पुणे ते पंढरपूर या सुमारे 250 किलोमिटर मार्गावर ही रॅली प्रवास करणार असून जी 20 परिषदे बरोबरच पर्यावरण विषयक जन जागृती करणार आहे . मार्गावर ठिकठिकाणी वृक्षारोपण देखील केले जाणार आहे.
महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्या हस्ते या रॅलीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला.यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते. रॅलीमध्ये महापालिका कर्मचाऱ्यांसह विविध स्वयंसेवी संस्था संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत .

