अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या शूटींग करण्यात व्यस्त आहे. ” जी करदा ” ही तिची आतापर्यंतचा सर्वात प्रतिक्षित वेब शो येणार असून याची रिलीज डेट ठरली आहे. हा वेब शो 15 जून 2023 रोजी Amazon Prime Videos रिलीज होणार आहे.
या वेबशो ची कथा सात मित्र त्यांच्या आयुष्यात काय घडतंय यावर भाष्य करणारी आहे. जेव्हा हे सगळे मित्र ते 30 वर्षांचे होतात तेव्हा त्यांचा मधील मैत्री आणि सहज सुंदर नात्यावर घडणारी ही गोष्ट आहे.
या वेब शो मध्ये तमन्ना भाटिया, आशिम गुलाटी, सुहेल नय्यर, अन्या सिंग, हुसैन दलाल, सायन बॅनर्जी, आणि सामवेदना सुवाल्का हे मित्रांच्या भूमिकेत आहेत. या वेब शो मध्ये सिमोन सिंग आणि मल्हार ठकर देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. अरुणिमा शर्मा लिखित आणि दिग्दर्शित, हुसैन दलाल, अब्बास दलाल लिखित आणि दिनेश विजन यांच्या मॅडॉक फिल्म्स निर्मित, आठ भागाचा हा वेब शो नक्कीच प्रेक्षकांना आवडणार यात शंका नाही.