पुणे -विना हेल्मेट जात असलेल्या एका तरुणाला पोलिसांनी अडवून त्यास वाहनाची कागदपत्रे, लायसन्स दाखविण्यास सांगितले. परंतु तरुणाने पोलिसांशी वाद घातल्याने त्यास बिबवेवाडी पोलिस ठाण्यात आणले असता संबंधित तरुणाने 57 वर्षीय सहाय्यक पोलिस फाैजदाराचे कानाखाली जाेरात मारल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी 2 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
गाैरव हरीश वालावकर (वय-29) व सुचेता चेतन घुले (28,दाेघे रा.चिंतामणी रेसीडन्सी, बिबवेवाडी,पुणे) असे अटक केलेल्या आराेपींचे नाव आहे. याबाबत सहाय्यक पोलिस फाैजदार रामदास महादेव बांदल (वय-57) यांनी आराेपी विराेधात बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, तक्रारदार पोलिस रामदास बांदल व सहाय्यक पोलिस निरीक्षक एस बरडे व इतर सहकारी 28 मे राेजी रात्री बिबवेवाडी परिसरात विमल विहार साेसायटीचे बाजुस नाकाबंदी करत हाेते. त्यावेळी आराेपी गाैरव वालावकर हा दुचाकीवरुन विना हेल्मेट जात असताना, पोलिसांनी त्याला थांबवले. त्याच्याकडे आरसीबुक व लायसन दाखवायला सांगितले असता, आराेपीने काेणतीही कागदपत्रे न दाखवता पोलिसांशी विनाकारण हुज्जत घातली.त्यानंतर त्याने मैत्रीण आराेपी सुचेता घुले हिला सदर जागी बाेलावून घेवून पुन्हा पोलिसांशी वाद घातला. त्यामुळे त्यास नंतर बिबवेवाडी पोलिस ठाणे येथे आणल्यानंतर आराेपी गाैरव याने अचानक पोलिस अधिकारी रामदास बांदल यांचे कानाखाली मारुन ‘आता काय करायचे ते करा’ असे बाेलून तक्रारदार करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला आहे. याबाबत बिबवेवाडी पोलिस पुढील तपास करत आहे.