उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानला धनादेश सुपूर्द
पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी येथे उभारण्यात येणाऱ्या श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या उभारणीसाठी सिटी कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे यांच्यातर्फे तीस लाख रुपये निधी देण्यात आला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थोरले बाजीराव प्रतिष्ठानचे सचिव कुंदनकुमार साठे यांनी हा धनादेश स्वीकारला.
एनडीए येथील पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. अजिंक्ययोद्धा बाजीराव पेशवे यांच्या पुतळा उभारणीसाठी पुण्यातून तसेच भारतातून निधी उभारण्यात आला आहे.
कुंदनकुमार साठे म्हणाले, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा भव्य पुतळा पुण्यातील एनडीए येथे उभारण्यात येणार आहे. पुतळ्याचे अनावरण ऑगस्ट २०२३ मध्ये होणार आहे. थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे लवकरच नाशिक मधील डुबेरे आणि औरंगाबाद येथील पालखेडमध्ये सुद्धा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे अश्वारूढ पुतळे उभारण्यात येणार आहेत. असेही त्यांनी सांगितले.
एनडीए येथे बाजीराव पेशवेंचा पुतळा उभारण्यासाठी ३० लाखाचा निधी
Date: