कोथरूड हॉस्पिटलमध्ये मातृदिन साजरा
पुणे, दिः १६ मेः दरवर्षी में महिन्याच्या दुसर्या रविवारी मातृदिन साजरा केला जातो. आईला समर्पित हा एक दिवस आहे. यावेळी आपण सर्व तिच्या आनंदाची व सुखाची काळजी घेण्याचा प्रयत्न करतो. पण इतर दिवशी त्यांना विशेष महत्व दिले जात नाही. आईवर अनेक जबाबदार्या असल्याने रोज काम करण्याचा दबाव असतो. तथापि नवीन मातासाठी हे अधिक आव्हानात्मक असते. कारण त्या शारीरिक तसेच मानसिक तणावातून जात आहेत. अशा परिस्थितीत नवीन मातांनी त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. असा सल्ला प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. मंजूषा प्रभूणे यांनी दिली.
जागतिक मातृदिनानिमित्त कोथरुड हॉस्पिटलतर्फे सर्व मातांसाठी विशेष संदेश देण्यात आला. या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. मंजूषा प्रभूणे बोलत होत्या. या वेळी कोथरूड हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजेंद्र मिटकर, प्रसिद्ध सर्जन डॉ. राजेंद्र गुंडावार उपस्थित होते. तसेच डॉ. संजना भारती, डॉ. प्राची अमराळे व डॉ. गिता वडरेकर उपस्थित होत्या.
डॉ. मंजूषा प्रभुणे म्हणाल्या, आज महिलांमध्ये आजारांचे प्रमाण वाढत असल्याने त्यांनी या कडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यातच गर्भवती महिलांनी बाहेरील सर्व खाद्य पदार्थ खाणे टाळावे. डोहाळे लागल्यावर त्यावर ही नियंत्रण ठेवेणे गरजेचे आहे. त्यांनी घरचाच डायट घ्यावा त्यातही काकडी, टोमॅटो, तुप, भरपूर पाणी आणि शारीरिक हालचाली ठेवाव्यात. आई ही कुटुंबाची गुढी असते. ती स्वस्थ्य आणि शिक्षित राहिली तर संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य उत्तम राहते. त्यामुळे प्रत्येक महिलेने स्वतःचे आरोग्य सांभाळावे.
डॉ. राजेंद्र गुंडावार म्हणाले, या हॉस्पिटलमधील अत्याधुनिक थिएटरची सुविधा असल्याने येथे कमी वजनांच्या बाळाची डिलीव्हरी सुद्धा केली जात आहे. तसेच महिलांच्या नाळेतील रक्त जमा करून ठेवण्याची योजना आखली आहे. त्यामुळे भविष्यात येथील जन्मलेल्या बाळाची आरोग्याची सर्व काळजी घेतली जाईल. येथे चार प्रकारचे अत्याधुनिक सुविधायुक्त ऑपरेशन थिएटर असल्याने सर्व प्रकारचे यशस्वी ऑपरेशन केले जाते.
डॉ. राजेंद्र मिटकर म्हणाले, अत्याधुनिक सुविधा व मशिनरींनी परिपूर्ण असलेल्या या हॉस्पिटलमध्ये ३ स्त्री रोग तज्ञ डॉक्टर आहेत. तसेच आधुनिक ऑपरेशन थिएटर असून महिलांसाठी विशेष वार्ड उपलब्ध करून दिले आहेत. येथे उच्च शिक्षित प्रशिक्षीत डॉक्टरांची टीम सदैव तत्पर असते. नवजात शिशूंसाठी अतिविशेष दक्षता विभाग एनआईसी सुरू करण्यात आला आहे. तसेच अन्य हॉस्पिटलच्या तुलनेत येथील शुल्क ५० टक्के कमी असून लग्झरी सुविधा देण्यात येत आहे.