मुंबई-ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची घोषणा केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा यासाठी आग्रह धरला होता. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी त्यांचा पक्ष अध्यक्षपदाचा राजीनामा अखेर मागे घेतला आहे.मुंबईतील वाय बी सेंटर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आपण राजीनामा मागे घेत असल्याचे शरद पवार यांनी जाहीर केलं. मात्र यावेळी अजित पवार मात्र अनुपस्थित राहील्याचे दिसून आले.एकूणच शरद पवारांच्या मागे बसलेले सर्व चेहरे बदलले आणि तरुणाईत ले होते . हे वेगळे चित्र पत्रकारांना सतावणारे दिसले.मात्र शरद पवारांच्या या पत्रकार परिषदेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेत्या सोनिया दुहान आणि आमदार संग्राम जगताप ही युवा ब्रिगेड शरद पवारांच्या अगदी मागे बसल्याचं पाहायला मिळालं.
या पत्रकार परिषदेत अजित पवार उपस्थित राहीले नाहीत यावरून विचारलेल्या प्रश्नाल शरद पवारांनी उत्तर दिलं. ते म्हणाले की, सगळे पत्रकार परिषदला असतात का?काही लोक येथे आले आहेत, काही गैरहजर आहेत. आज पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी एकमताने निर्णय घेऊन तो निर्णय मला कळवला. त्यामुळे येथे कोण आहे आणि कोण नाही असा प्रश्न उपस्थित करणे योग्य नाही,”, असं उत्तर शरद पवारांनी दिलं. शिवाय अजित पवार दिल्लीला गेले, ही माहिती चूक आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भाजपमध्ये जाऊ इच्छितात हे खोटे असल्याचे त्यांनी सांगितले..
“उत्तराधिकारी निर्माण करेन
शरद पवार म्हणाले, “उत्तराधिकारी निर्माण करेन ही संकल्पना मी ठरवलेल्या गोष्टींपैकी नाही. मात्र, ही गोष्ट माझ्या मनात जरूर आहे की, संघटनेत काही नवीन सहकाऱ्यांना आणून संधी दिली पाहिजे. याबाबत मी सहकाऱ्यांशी चर्चा करेन.”“काही लोक १०-१५ वर्षे जिल्हास्तरावर काम करतात आणि ते राज्यपातळीवरही काम करू शकतात ही क्षमता त्यांच्यात आहे हे आम्हाला माहिती आहे. तसेच राज्यस्तरावर अनेक वर्षे काम करणारे लोक आहेत जे राष्ट्रीय पातळीवरही काम करू शकतात. त्यांना प्रोत्साहित करणं आणि संधी देणं ही जबाबदारी माझी आणि माझ्या वरिष्ठ सहकाऱ्यांची आहे. आम्ही ही जबाबदारी हळूहळू पार पाडणार आहोत,” असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.