संगीत ,गाणी ,हे फक्त मनोरंजनाच विश्व नसून त्यातून समाज प्रबोधन सुद्धा करता येत ,मुक्याला वाचा देता येते ,ओसाड .उजाड पडलेल्या जमिनीला पाण्याच्या प्रेमाने बहार देता येते ,रूढी परंपरेच्या नावाखाली चिरडल्या जाणाऱ्या चिमुकल्या रोपट्यानंसाठी ,या देशातील तमाम शोषित वंचित देवदासींनी साठी …प्रेम वारं …
संगीत क्षेत्रात बोल बंजारा या नवीन music चॅनेल द्वारे दमदार आणि झंझावात प्रदार्पण करणाऱ्या दिग्दर्शक व निर्माता श्री .संजीवकुमार राठोड यांची आणखी एक नूतन व प्रबोधनात्मक कलाकृती …प्रेम वारं .
देवदासी – देव आणि धर्माच्या नावावर ,स्वतःला खुश करण्यासाठी दुसऱ्याच्या आयुष्यात दुःख व वेदना पेरून,काटेरी आयुष्य उगवणारी प्रथा ,याच कथेवर प्रकाश टाकून ,मनाला आणि आयुष्याला लख लख करणारी प्रेम कहाणी म्हणजे मराठी अल्बम प्रेम वार ! ईश्वराशी लग्न लावून माणसांशी नातं तोडणारी क्रूर व घाणेरडी परंपरा …देवदासी .
देवदासी हि प्राचीन प्रथा ,भारतात खास करून दक्षिण भारतात धर्म आणि आस्थेच्या नावावर सुरु झालेली वेश्यावृतीची हि दलदल ,देवाला खुश करण्यासाठी स्वतःला महिला देवासाठी समर्पित करायची,कालातंराने देव आणि देवदासमधील दूत म्हणून पुजाऱ्यांनी ह्या सर्व स्त्रियां सोबत शरीर संबंध ठेवायला सुरुवात केली आणि या तथाकथित महान परंपरेला राजा महाराजांनी हातभार लाऊन त्याचा बाजार मांडला व मुगल काळात जेव्हां देवदासींची संख्या वाढू लागली व त्याचं पालन पोषण पुजारी व अय्याश राजांच्या आटोक्याच्या बाहेर गेल तेंव्हा देवदासींना सार्वजनिक संपती घोषित करून ती लोक मोकळी झाली ! मुख्यतः आंध्रप्रदेश व कर्नाटक मध्ये हि प्रथा ,परंपरा आज हि सुरु आहे .
या सामाजिक व प्रबोधनात्मक गाण्याला संगीतबद्ध केलं आहे संगीत दिग्दर्शक श्री. कृष्णा दाभाडे आणि श्री. प्रशांत फसगे यांनी ,स्वरबद्ध केलं आहे श्री.कृष्णा दाभाडे आणि कु.प्रतीक्षा भाटिया यांनी ,गीतकार म्हणून श्री .सुमित वाघमारे ,श्री .अभिजीत आणि आर .आर .कोलेकर यांचं योगदान आहे .
एक उत्कृष्ट गाणं करायला एक उत्तम निर्माता व त्यांची फौज लागते ,निर्माता म्हणून श्री. संजीवकुमार राठोड ,श्री.सतीश रमेश काकडे ,श्री.रुपेश सुरेश रोकाटे ,श्री.प्रमोद कांबळे यांनी धुरा सांभाळली आहे .या सुंदर गाण्यांत अभिनेता श्री.संकेत मोरे व अभिनेत्री कु.श्रेया पळसकर यांनी दमदार कामगिरी केली आहे.
तंत्रज्ञाच्या टीम मध्ये DOP म्हणून श्री.पारस मोनी बोरा व श्री .शुभम नाईक ,क्रीयेटीव्ह डायरेक्टर व सह निर्माता श्रीमती .शालिनी राठोड ,कार्यकारी निर्माता म्हणून श्री.शादाब अख्तर व प्रथमेश शेलकर यांचा समावेश आहे.