मुंबई– स्टार गोल्ड थ्रिल्स या डिस्ने स्टार नेटवर्कवर नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या चॅनेलवर हिंदीत डब केलेल्या इंग्रजी सिनेमांची मजा घेता येणार आहे. हे चॅनेल डीडी फ्री डिशवर उपलब्ध करण्यात आलं आहे. स्टार गोल्ड थ्रिल्स हे डब केलेले आंतरराष्ट्रीय सिनेमे दाखवण्यासाठी समर्पित असलेलं भारतातील पहिलं चॅनेल असून त्यामुळे भारतातील सिनेमाप्रेमींना हॉलिवूड आणि इतर आंतरराष्ट्रीय सिनेमे घरबसल्या, शिवाय त्यांच्या पसंतीच्या भाषेत- हिंदीत पाहाता येतील.
स्टार गोल्ड थ्रिल्सच्या प्रेक्षकांना अॅक्शन, फँटसी, अॅनिमेशन, क्रीएचर फीचर, हॉरर, साय- फाय असे वेगवेगळ्या प्रकारचे सिनेमे तसेच आयर्न मॅन, कॅप्टन अमेरिका, बॅटमॅन व सुपरमॅन अशा सुपरहिरो मूव्हीजचा आनंद घेता येईल. हे सिनेमे अर्थातच हिंदीत डब केलेले असतील.
स्टार गोल्ड थ्रिल्सवर मार्वल व डी सी चे सर्वोत्तम सिनेमे व त्याचबरोबर मिशन इम्पॉसिबल, गॉडझिला, एक्स- मेन, ट्रान्सफॉर्मर्स, डाय हार्ड आणि पायरेट्स ऑफ कॅरेबियन असे प्रसिद्ध सिनेमे पाहायला मिळतील. या चॅनेलवर हिंदीमध्ये डब करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय सिनेमांचं सर्वात मोठं कलेक्शन प्रेक्षकांसाठी सज्ज करण्यात आलं आहे.
उन्हाळ्याची सुट्टी सुरू होत असल्यामुळे लहान मुलांनाही स्टार गोल्ड थ्रिल्सवर धमाल सिनेमे पाहाता येतील. रोज सकाळी या चॅनेलवर मुलांच्या आवडीचे दर्जेदार अॅनिमेशन आणि कौटुंबिक सिनेमे पाहाता येतील, तर संध्याकाळी सात वाजता अॅक्शन आणि थ्रिलचा अनुभव देणारे सिनेमे दाखवले जातील.
स्टार गोल्ड थ्रिल्स डीडी फ्री डिशवर उपलब्ध करण्यात आलं असल्यामुळे देशभरातील प्रेक्षकांना ते सहजपणे पाहाता येईल. तेव्हा वाट कशाची पाहाताय? तुमचा डीडी फ्री डिश सेट टॉप बॉक्स रिट्यून करा आणि स्टार गोल्ड थ्रिल्स ट्यून करा व हॉलिवूडमधले सर्वात मोठे सिनेमे हिंदीत पाहाण्याचा आनंद घ्या.