डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भिमथॉन स्पर्धेचे आयोजन

Date:

पुणे, –  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भिमथॉन स्पर्धेचे दुसऱ्यांदा आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. डॉ. आंबेडकर यांचे विचार समाजातील सर्व घटकापर्यंत पोहचवण्यासाठी तसेच सामाजिक एकता आणि समानतेचा संदेश देणारी हि स्पर्धा मॅरेथॉनच्या धर्तीवर आधारित आहे. १४ एप्रिल रोजी सकाळी ६:३० वा. सारसबाग जवळील सणस मैदानापासून सुरु होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पुणे स्टेशन येथे समारोप होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या शुभहस्ते होणार आहे. महिला, पुरुष व १८ वर्षाखालील युवा गटात लढत होणार आहे. विजेत्यांना ट्रॉफ़ी, मेडल, सर्टीफिकेट मिळणार असून सहभागी सर्व स्पर्धकांना सर्टीफिकेट व मेडल मिळणार आहे. पुणे जिल्हा हौशी अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या मान्यतेने हि स्पर्धा घेण्यात येते. यंदा स्पर्धेचे दुसरे वर्ष आहे.

या स्पर्धेमध्ये शाळा, कॉलेजसह इतर स्वयंसेवी संस्थां व मंडळांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले.

देश अमृतमहोत्सवी बर्ष साजरे करित असताना समाज्यातील जातीय, धार्मिक बंधुभाव जपून सामाजिक एकता – समानतेचा संदेश देण्यासाठी भिमथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. संविधान जनजागृती, ऐक्याचा संदेश, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वेळोवेळी मांडलेले विचार समाज्यातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचवण्यासाठी भिमथॉनचे आयोजन करण्यात आले असल्याचे माय अर्थ फांउडेशनचे अध्यक्ष अनंत घरत म्हणाले.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सामाजिक क्रांती घडवून आणू शकतात, यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे स्पार्क फांउडेशचे किशोर कांबळे म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रस्ता वाहतुकीसाठी तुमच्या आंदोलनासाठी नाही, या महिलेने पेटविली क्रांतीची ठिणगी

क्रांती करणारे..वेडेच ठरविले जातात : तिला शाळेतून मुअलाला पिकअप...

कोरेगाव पार्क–कल्याणी नगर–मुंढवा परिसरात वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजनांना गती-मुंढवा चौकात १२६ कोटींचा फ्लायओव्हर

स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती पुणे,: कोरेगाव पार्क–कल्याणी...

खरात ची वरात कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्स मधून रुग्णालयाकडे

अशोक खरातची प्रकृती बिघडली:छातीत वेदना, डोकेदुखी, मळमळ, उलट्यांचा त्रास;...