पुणे- जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघातर्फे सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी मार्गदर्शक मेळाव्याचे आयोजन हडपसरमधील साधना विद्यालय आणि आर. आर. शिंदे ज्युनिअर कॉलेजचे कर्मवीर सभागृहमध्ये करण्यात आले. महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, सहाय्यक निबंधक सतीश ढमाळ, असिस्टट हेल्थ ऑफिसर डॉ. कल्पना बळीवंत, अॅड. नीता संग्राम साळुंके, अॅड. अजित अर्जुन चौगुले , माजी महापौर राजलक्ष्मी भोसले यांनी विविध विषयांवर संस्थांना मार्गदर्शन केले. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माजी उप-अधिक्षक अर्जुन सिताराम चौगुले , व शिवाजी मराठा सोसायटीचे संचालक पुणे तानाजी गंगाराम घारे आदी मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्याचे संयोजन अॅड. अजित अर्जुन चौगुले यांनी केले होते .
सुहास पटवर्धन यांनी महासंघाची माहिती सांगून उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. मा. सतीश ढमाळ यांनी डीम्ड कन्व्हेअन्स बद्दलशंकांचे समाधान केले व शासनाच्या वतीने सहकार्याने सहकार्याचे आश्वासन दिले. डॉ. कल्पना बळीवंत यांनी सध्या झपाट्याने पसरणाऱ्या डेंगू, मलेरिया, चिकुनगुनिया या आजारांबाबत चित्रफितीद्वारे सादरीकरणकेले व जागृतीसाठी पुणे मनपाचे प्रयत्न सुरु असून नागरिकांनी सहकार्य करावे अशी विनंती केली.
अॅड. अजित अर्जुन चौगुले यांनी कन्व्हेअन्स व डीम्ड कन्व्हेअन्स या विषयावर सविस्तर माहिती दिली. संस्थांनी लवकरात लवकर डीम्ड कन्व्हेअन्स करून घ्यावे असे आवाहन केले.अॅड. नीता संग्राम साळुंके, यांनी सह. गृह. संस्थेतील त्रासदायक असणाऱ्या थकबाकी वसुलीची कायदेशीर प्रक्रिया, त्याचे महत्त्व, यांचीमाहिती देऊन उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.माजी महापौर राजलक्ष्मी भोसले यांनी मेळावा आयोजित केल्याबद्दल महासंघाचे आभार मानले. तसेच सह. गृह. संस्थांनी प्रदूषण कमी करणे, झाडे लावणे, कचरा व्यवस्थापन याद्वारे पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले. त्यासाठी त्या स्वतः पुढाकार घेऊन मार्गदर्शन करतील. कार्यक्रमाचे नियोजन महासंघाच्या सचिव मनीषा कोष्टी यांनी केले. सूत्रसंचालन चारुहास कुलकर्णी यांनी केले. सह. गृह. संस्थांच्या प्रतिनिधींनी मेळावा आयोजित केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.