बापूसाहेब गानला यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त सत्कार
पुणे -कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष तथा सिध्दार्थ ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष बापूसाहेब गानला यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त कर्तव्य फाऊंडेशन तर्फे पुणेरी पगडी,मफलर व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर,लष्कर पो.ठाण्याचे व.पो.निरीक्षक वसंत कुवर,फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे,कार्याध्यक्ष अशोक देशमुख,उपाध्यक्ष सचिन कांबळे,ग्रंथपाल दिलीप भिकुले,बज्मे रहेबर कमिटीचे अक्रम शेख,समता सामाजिक संस्थेचे विजय भोसले, दीपक कु-हाड़े, अय्युब खान,संजय फटके,इरफान मुल्ला आदी उपस्थित होते.
बापूसाहेब गानला यांनी कॅन्टोन्मेंट भागात राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक व साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. ते 1968 ते 1997 या कालावधीत पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य होते याच दरम्यान ते सहा वेळा बोर्डाचे उपाध्यक्ष होते.1976 पासून ते पुणे जिल्हा बाॅड़ी बिल्डींग असोसिएशन मध्ये कार्यरत असून सध्या ते अध्यक्ष आहेत तसेच त्यांनी पुणे जिल्हा हाॅकी फेड़रेशन,पुणे जिल्हा सायकल असोसिएशन ,पुणे जिल्हा वेटलिफ्टींग असोसिएशन आदी संघटनावर त्यांनी काम केले आहे.ते अनेक वर्षे पुणे कॅन्टो.सहकारी बॅंकेचे संचालक व अध्यक्षही होते.गेली 30 वर्षापासून सिध्दार्थ ग्रंथालयाचे पदाधिकारी असून सध्या कार्याध्यक्ष पदी कार्यरत आहेत.पुणे कॅन्टो.शातता कमिटीच्या माध्यमातून आजतागायत त्यांनी सर्व धर्मीय मिरवणूकींचे स्वागत करून जातीय सलोखा राखण्याचा प्रयत्न केला आहे.