Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

गुरु पौर्णिमा विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरी

Date:

पुणे- गुरु पौर्णिमा आज येथे विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली . यामध्ये सोमवार पेठमधील सयाजीनाथ माळी महाराज मठात भाविकांनी गर्दी केली होती . यावेळी मठात अभिषेक करण्यात आला . त्यानंतर महापूजा करण्यात आली . मठात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती . भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला .

नरपतगीर चौकातील श्री साईसेवा प्रतिष्ठानच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रमांनी गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली . यावेळी शंकर महाराज मठातील पुजारी शंकर महाराज यांच्याहस्ते पूजा करण्यात आली . यावेळी अभिषेक , लघुरुद्र आणि सत्यनारायण महापूजा करण्यात आली . सायंकाळी फराळ आणि दुग्धपान लाभ साईभक्तानी घेतला . सर्व साई भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला . या कार्यक्रमाचे संयोजन दिलीप बहिरट , गोपी कुरवर , विशाल नाटेकर , संदीप शिंदे , प्रतिक साळवे , मुन्ना ढोले , आदित्य कोळके , विराज लोहकरे आदींनी विशेष परिश्रम घेतले .

भवानी पेठ मधील जानाई मळ्यामध्ये श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला . सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षी या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी स्वामी समर्थ भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला . त्यानंतर अन्नदान करण्यात आले . कार्यक्रमाचे संयोजन विशाल भोसले , भारत भोसले , मुन्ना शेख , बबलू सय्यद , निसार शेख , मनोज सूर्यवंशी , नवनाथ रायकर , हणमंत पाटील , पवन म्हेत्रे आदींनी केले होते . यावेळी नगरसेवक संजय बालगुडे , नगरसेवक अजय खेडेकर , , नगरसेविका अर्चना तुषार पाटील , नगरसेवक बापू कांबळे , शंतनू कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नेहरू,इंदिराजी,राजीव आणि सोनिया गांधीना व्होट चोरीप्रकरणी अमित शहांनी केले लक्ष….(व्हिडीओ)

कॉंग्रेस आणि विरोधी पक्षांनी अखेरीस केला सभात्याग .. नवी दिल्ली-...

पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का नाही केला? अखेरीस पुणे पोलिसांना हाय कोर्टानेही केला सवाल

पुणे-मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी एफआयआरमध्ये पार्थ पवारांचे नाव का...

गांजा विक्री करणा-या तरुणीला केले जेरबंद

पुणे- मुंढवा येथील एका गांजा विकणाऱ्या २९ वर्षीय तरुणीला...