पुणे-लतिकाताई साठे सामाजिक फाउंडेशनच्यावतीने लतिकाताई साठे यांच्या स्मरणार्थ ” सामाजिक क्रांतिरत्न पुरस्कार ” आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते ,शिक्षण मंडळाचे माजी सदस्य वसंतराव साळवे यांना जेष्ठ विचारवंत व्ही. जी . दस्तुरे यांच्या हस्ते देण्यात आला . क्वीन्स गार्डन मधील शासकीय विश्रामगृहात झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लतिकाताई साठे सामाजिक फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप भंडारी , रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पुणे शहर अध्यक्ष महेंद्र कांबळे , मुरलीधर जाधव , शैलेंद्र चव्हाण ,अशोक शिरोळे , सुधीर पवार , बाळासाहेब पठाण , रमेश तेलवडे , अजय भोसले , बाळासाहेब कावरे , संजय रोकडे , अरुण भिंगारदिवे , चंद्रकांत सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते .
या कार्यक्रमामध्ये वसंतराव साळवे , मुरलीधर जाधव , महेंद्र कांबळे , छाया लोंढे , निलेश आल्हाट याना ” सामाजिक क्रांतिरत्न पुरस्कार ” देउन सन्मानित करण्यात आले .
या कार्यक्रमाचे प्रास्तविक व उपस्थितांचे स्वागत संतोष पवार यांनी केले तर सूत्रसंचालन अनिल चौधरी यांनी केले तर आभार डॉ. बळीराम ओहोळ यांनी मानले . या कार्यक्रम संयोजन करण्यासाठी देविका चव्हाण , पूनम तावरे , ट्रेझा विल्सन , गिरीश जाधव , जयसिंग साठे , बाळासाहेब तावरे , अजय भोसले , चंद्रकांत सोनवणे , दीपक ससाणे आदींनी विशेष परिश्रम घेतले .