पुणे, दि.६ जुलै : विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूह, पुणे व भारत अस्मिता फाऊंडेशन, पुणे तर्फे राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड यांची स्मृती जपण्याच्या आणि विविध क्षेत्रातील गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड यांच्या नावाने २०१० पासून राज्यस्तरीय पुरस्कार दिले जात आहेत. या पुरस्कारांचे हे आठवे वर्ष आहे.
कृषी, आरोग्य, शिक्षण, क्रीडा, सामाजिक, प्रसारमाध्यमे, ग्रामविकास (आदर्श गाव व बचतगटप्रमुख) व अध्यात्म अशा विविध क्षेत्रांमध्ये ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी व ग्रामीण भागातील लोकांच्या कल्याणासाठी उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तीला हे पुरस्कार दिले जाणार आहेत.
या पुरस्कारासाठीचे नामांकने प्रति- मा. जनसंपर्क अधिकारी, जनसंपर्क विभाग, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी कॉलेज, स.नं. १२४, पौड रोड, कोथरूड, पुणे – ४११ ०३८ या पत्त्यावर किंवा mitpro1@gmail.com किंवा maeerpro1@gmail.com या ई-मेलवर शनिवार, दि. २९ जुलै २०१७ पर्यंत पाठवावीत, असे नम्र आवाहन आम्ही करीत आहोत.