पुणे-
34 व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये होणाऱ्या मिस पुणे फेस्टिव्हल 2022 च्या अंतिम 20 स्पर्धक तरुणींनी आज वनाज मेट्रो स्टेशन वर रॅम्प वॉक करून पुणेकरांची मने जिंकली. वनाज स्टेशन ते गरवारे स्टेशन मेट्रोतून प्रवास करण्याचा आंनद सुद्धा लुटला. या वेळेस महा मेट्रो डायरेक्टर श्री अगरवाल, . मनोजकुमार डॅनियल यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. पुणे फेस्टिव्हल चे उपाध्यक्ष श्री कृष्णकुमार गोयल, प्रमुख संयोजक सतीश देसाई, फेस्टिव्हल कमिटी चे काका धर्मावत, मोहन टिल्लू मिस पुणे फेस्टिव्हल च्या शो डायरेक्टर जुई सुहास व आयोजिका सुप्रिया ताम्हाणे उपस्थित होत्या.