पुणे :
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी च्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ‘ तर्फे ‘महाराष्ट्र सेंटर फॉर आंत्रप्रुनरशिप डेव्हेलपमेंट ‘ (एम सी ईडी ) च्या सहकार्याने ३ दिवसांचे उद्योजकता प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते .
‘एमसीईडी ‘ चे विभागीय व्यवस्थापक सुरेश उमप ,प्रकल्प अधिकारी शशिकांत कुलकर्णी ,प्रशिक्षक एस . व्ही . शेटे ,युवराज लांबोळे ,प्रकल्प समन्वयक दीपाली वाकोडे ,जी .एच .वाय तिरंदाज ,मनोहर बोरगावकर ,मिलिंद कांचन ,यांनी उद्योजकता संधींबद्दल मार्गदर्शन केले .
संस्थेचे सचिव लतीफ मगदूम ,सहसचिव इरफान शेख ,डॉ . किरण भिसे उपस्थित होते . प्राचार्य डॉ . व्ही . एन .जगताप यांनी स्वागत केले . साबा शेख ,तस्लिम कुरेशी यांनी सूत्रसंचालन केले .