मार्टिन करतोय ‘फनरल’ चित्रपटाचं प्रमोशन!

Date:

‘जगू आनंदे, निघू आनंदे’ या टॅगलाईनसह जगण्यासोबतच मरणाचाही आनंदोत्सव करण्याचा कानमंत्र देणारा ‘फनरल‘ हा मराठी चित्रपट मागील बऱ्याच दिवसांपासून देश-विदेशांतील चित्रपट महोत्सवांमध्ये आपला ठसा उमटवत आहे. सिनेसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या निर्माते व लेखक रमेश दिघे व दिग्दर्शक विवेक दुबे या जोडीनं एक छान सामाजिक कथा ‘फनरल‘ चित्रपटरूपात मांडली असून, सध्या हा सिनेमा एका वेगळ्याच कारणामुळं मुंबईपासून महाराष्ट्रातील विविध शहरांपर्यंत सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.

आपल्या धर्मशास्त्रामध्ये काही पशू-पक्षी अपवित्र मानले आहेत. या यादीत सर्वप्रथम येतो तो कावळा… कावळा आपल्या जवळ जरी आला तरी आपण त्याला हकलतो, त्याचा तिरस्कार करतो. असा हा अपवित्र असलेला कावळा काही वेळी मात्र पवित्र बनतो. मानवाच्या निधनानंतर दशक्रिया विधीवेळी कावळा पिंडाला शिवणं हे शुभ मानलं जातं. त्यावेळी कावळ्याच्या रूपात आपल्याला आपले पूर्वज दिसू लागतात. पिंडाला कावळा शिवला नाही, तर मृत्यू झालेल्या व्यक्तीची कोणतीतरी इच्छा अधूरी राहिल्याचं मानलं जातं. कावळा पिंडाला शिवण्यासाठी चातकासारखे आकाशाकडे डोळे लावून त्याची वाट पाहिली जाते आणि अखेर काव… काव… करत जेव्हा कावळा येऊन पिंडाला शिवतो तेव्हा दशक्रियेतील महत्त्वाचा टप्पा पूर्ण होतो. धर्मशास्त्रात अशुभ मानल्या जाणाऱ्या याच कावळ्याला सोबत घेऊन ‘फनरल‘ चित्रपटाचं प्रमोशन करण्याची अनोखी शक्कल चित्रपटाच्या निर्मात्यांनी लढवली आहे.

‘फनरल‘ चित्रपटातही एक कावळा आहे, जो नायक साकारलेल्या आरोह वेलणकरला नेहमी भेटतो. आरोहही त्याला काही ना काही खायला देतो. आरोहनं चित्रपटात या कावळ्याचं नाव ‘मार्टिन’ ठेवलं आहे. चित्रपटातील ‘मार्टिन क्रो’ आता प्रेक्षकांच्याही भेटीगाठी घेत आहे. ‘फनरल‘च्या प्रमोशनसाठी एक भला मोठा कावळा बनवण्यात आला आहे. हा कावळा पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्येही चर्चेचा विषय ठरला होता आणि इफ्फीमध्येही रेड कार्पेटवर चालूनही त्यांनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. हाच मार्टिन सध्या मुंबईसह महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमधील लोकांना भेटतोय. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वचजण या कावळ्याला पाहून खुश होत असून, त्याच्या प्रेमात पडले आहेत. कावळ्यासोबत फोटो काढण्यासाठी गर्दी करत आहेत. ‘फनरल‘च्या निमित्तानं एक वेगळी संकल्पना राबवण्यात येत आहे.

माणूस आयुष्यभर खूप चिंता करत असतो. आयुष्य संपायला येतं तेव्हा बऱ्याच गोष्टी करायच्या राहून गेल्याचं जाणवतं. याच सर्व गोष्टींवर तिरकस शैलीत भाष्य करताना, कोणाच्याही भावना न दुखावता विनोदी पद्धतीनं वास्तववादी घटनांचं सादरीकरण ‘फनरल‘ मध्ये करण्यात आलं आहे. यातील संवाद खूप अर्थपूर्ण असून, घराघरातील कथा सांगणारे आहेत. आरोह वेलणकर, संभाजी भगत, प्रेमा साखरदांडे, विजय केंकरे आदी कलाकार या चित्रपटात आहेत. आयुष्याकडे बघण्याचा अगदी वेगळा विचार घेऊन ‘बीफोर आफ्टर एंटरटेंन्मेंट’ प्रस्तुत ‘फनरल‘ चित्रपट १० जूनला चित्रपटगृहांत येत आहे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

दिवाळी पहाट मैफलीतच ख्यातनाम मृदंगवादक श्रीधर पार्थसारथी यांची प्राणज्योत मालवली; वादन करताना मंचावर कोसळले!

पुण्यातील बाणेरमध्ये हृदयविकाराचा झटका; डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न अपयशी, शंकर...

एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील बंगल्याजवळ पोलिसांच्या एस्कॉर्ट वाहनाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही!

लुईसवाडी परिसरात मध्यरात्री घडली घटना; अग्निशमन दलाने आग आटोक्यात...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संसदीय कारकिर्दीच्या शताब्दीनिमित्त पुणे महापालिका राबवणार विशेष उपक्रम

व्याख्यानमाला, परिसंवाद, प्रदर्शनांसह वर्षभर विविध कार्यक्रम; एक कोटी रुपयांच्या...