मुंबई, 8 जानेवारी, 2021 : महिंद्रा अॅंड महिंद्रा लि. (एम अॅंड एम) या कंपनीने आपल्या वैयक्तिक व व्यावसायिक श्रेणीतील वाहनांच्या किंमती 1.9 टक्क्यांनी वाढवीत असल्याची घोषणा आज येथे केली. यामुळे या कंपनीच्या विविध श्रेणींतील वेगवेगळ्या मॉडेल्सच्या किंमतींमध्ये 4,500 ते 40 हजार रुपये इतकी वाढ झाली आहे. ही वाढ आज, दि. 8 जानेवारी 2021 पासून अमलात येईल.असे महिंद्रा अॅंड महिंद्रा लि. चे व्हाईस प्रेसिडेंट (कम्युनिकेशन्स) मोहन नायर यांनी कळविले आहे.
त्यांनी असेही म्हटले आहे कि,’‘ऑल-न्यू थार’च्या बाबतीत, 1 डिसेंबर 2020 ते 7 जानेवारी 2021 या काळात नोंदणी झालेल्या गाड्यांवर ही सध्याची भाववाढ लागू होणार आहे. ‘ऑल–न्यू थार’साठी दि. 8 जानेवारी 2021पासून होणाऱ्या सर्व नव्या नोंदणींसाठी, गाडीच्या डिलिव्हरीच्या वेळी असणारी किंमत लागू राहील. महिंद्रा अॅंड महिंद्रा ही 19.4 अब्ज डॉलर्सची उलाढाल असलेल्या महिंद्रा समुहातील प्रमुख कंपनी आहे.
‘एम अॅंड एम लि.’च्या ‘ऑटोमोटिव्ह डिव्हिजन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी वीजय नाकरा यांच्या म्हणण्यानुसार, “गेल्या अनेक महिन्यांपासून वस्तूंच्या किंमती आणि इतर विविध प्रकारचे खर्च यांमध्ये अभूतपूर्व वाढ झाल्यामुळे आम्हालाही किंमती वाढविणे आवश्यक ठरले. आम्ही खर्च कमी करण्यासाठी सर्व प्रयत्न केले. किंमती वाढविण्याचा निर्णय आम्ही बराच काळ लांबणीवरही टाकला; परंतु कच्चा माल व इतर खर्चांमध्ये वाढ होत राहिल्याने, आम्हाला 8 जानेवारी 2021 पासून किंमती वाढवाव्या लागत आहेत.”
‘महिंद्रा’विषयी:
महिंद्रा समूह हा 19.4 अब्ज डॉलर्स इतकी उलाढाल असलेला अनेक कंपन्यांचा समूह आहे. हा समूह लोकांना नाविन्यपूर्ण वाहने पुरवून ग्रामीण भागात समृद्धी आणण्यास, तसेच शहरी नागरिकांचे राहणीमान वाढविण्यास मदत करतो. नवीन व्यवसायांचे व्यवस्थापन आणि समाजोपयोगी कार्येही हा समूह करीत असतो. भारतात युटिलिटी वाहनांचे उत्पादन, माहिती तंत्रज्ञान, आर्थिक सेवा आणि पर्यटन स्थळांच्या क्षेत्रातील उद्योग यांमध्ये या समुहाचे नाव अग्रभागी आहे. महिंद्रा ही जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर उत्पादक कंपनी आहे. या समुहाच्या अन्य व्यवसायांमध्ये अपारंपरिक ऊर्जा, कृषि व्यवसाय, लॉजिस्टिक्स, रिअल इस्टेट विकसन या उद्योगांचा समावेश आहे. भारतातच मुख्यालय असलेला महिंद्रा उद्योग समूह 100 देशांमध्ये 2,56,000 हून अधिक लोकांना रोजगार देतो.