महिलारग्बीटीमच्याकप्तानवाहबिजभरुचा प्रमुखअतिथी
पुणे : आनंद संघाने आपली ५० वर्ष पुर्ण होण्याच्या औचित्यावर ६ जानेवारी रोजी बी द चेंज नावाच्या वॉकथॉनचे आयोजन केले आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारती पासुन याची सुरूवात होईल होईल. ग्रामीण वैद्यकीय क्षेत्राचे प्रशिक्षित सर्जन, स्पिरिचुअल डायरेक्टर आनंद संघ डॉ.आदित्य गाइत आणि आरोग्य व वैद्यकीय चिकित्सक डॉ.अमर अगरवाल यांनी आज पत्रकार संघात झालेल्या पत्रकार वार्तेमध्ये याची माहिती दिली, पुढे पत्रकारांशी वार्तालाप करताना त्यांनी चांगली आणि निरोगी जीवनशैली कशी जपावी यावर देखील भाष्य केले.
यावेळी राष्ट्रीय महिला रग्बी टीमच्या कप्तान वाहबिज भरुचा विशेष अतिथी आणि डॉ नितीन कर्मलकर (उप कुलपती, सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी) प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होत्या आणि वॉकथॉनच्या वेळी देखील त्या उपस्थित राहून यात सहभागी होणार आहेत. वॉकेथॉननंतर लगेच आनंद संघातर्फे विनामूल्य योग आणि ध्यान कार्यशाळा अायोजित केली जाईल. भारतात, आनंद संघाची गतिशील शिक्षण केंद्रे आणि ध्यान केंद्रे एनसीआर पुणे, मुंबई, बंगलोर, चेन्नई व इतर शहरात देखील यशस्वीरित्या सुरु आहेत.
“बी द चेंज” शीर्षक असलेले हे वॉकथॉन आरोग्य आणि निरोगीपणासाठी घेतलेला पुढाकार असून ते “हेल्थ क्वेस्ट २०१९” साठी उचललेले पहिले पाऊल आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात असे म्हटले आहे की ६३ टक्के जागतिक मृत्यु दर हा अस्वस्थ जीवनशैलीमुळे आहे. वॉकेथॉनचा उद्देश आहे शारीरिक क्रियाकलापांना प्रोत्साहन देणे आणि निरोगी जीवनशैली स्वीकारणे. या उद्दीष्ट पूर्ततेसाठी, आनंद संघ २०१९ मध्ये योग, ध्यान, आरोग्य, उपचार, शिक्षण, व्यवसाय अशाकार्यशाळांचेआयोजनकरणारआहे. ज्यातप्रत्येकजणसहभागघेऊशकतो . येथेयोगआणिआधुनिकसंशोधनासएकत्रआणलेजाईल. , यामधुनजमाहोणारेप्रवेशशुल्कहेगरजूंनादानकेलेजाईल.
याआधी देखील आनंद संघाने वृन्दावनच्या विधवांसाठी अश्याच प्रकारे एका कार्यक्रमाच्या आयोजन केले होते व यातुन मिळालेला निधी त्यांना दान केला होता.
वॉकथॉनचा उद्देश्य आहे लोकांना चालण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि चांगल्या आरोग्याचे महत्व सांगणे. पुढे योगा, ध्यान, आरोग्य, शिक्षण अश्या प्रकारच्या वर्कशॉपचे देखील आयोजन करण्यात येईल. परमहंस योगानंद यांच्या प्रेरणेतुन सुरू असलेला आनंद संघाचे पश्चिम योग जगतामध्ये मोठे नाव आहे.