वंचित मुलांचे शिक्षण आणि विकासासाठी फाउंडेशन कार्यरत
पुणे-
महाराष्ट्रातील वंचित मुलांसाठी आणि त्यांना शिक्षण मिळावे ह्या उद्येशाने २००३ साली पुराणिक फाउंडेशनची स्थापना करण्यात आली होती. सौ. पुराणिक उर्फ ममाजी ह्यांनी पुण्यात २४ एकरच्या जागेत वीजन इंटरनॅशनल लर्निंग सेंटर या रेसिडेंशीयल शाळेची स्थापना केली आणि त्याला “समर्थगड” असे नाव दिले. आज वीजन इंटरनॅशनल लर्निंग सेंटर येथे ८० मुले आहेत. ह्या सगळ्या मुलांचा सर्वोत्तम विकास व्हावा म्हणून इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषा शिकविण्याकरिता तज्ञ शिक्षक आहेत. ह्या शिक्षणपद्धतीमध्ये दैनंदिन गोष्टीदेखील शिकविल्या जातात. इथे अतिशय उत्तम ऑर्केस्ट्रा आणि खेळाडूंची टीमदेखील आहे.पुराणिक फाउंडेशनच्या अनोख्या उपक्रमा अंतर्गत पुण्यातील समर्थगड येथे युएसए आणि भारतीय विद्यांर्थ्यांची सामूहिक कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती.
पुराणिक फाउंडेशन ही एक स्वयंसेवी संस्था असून वंचित मुलांकरिता शिक्षण, दैनंदिन गरजा पुरविण्यासाठी कार्य करते.हॉस्टन, युएसए येथे त्यांचे मुख्यालय आहे. आंतरराष्ट्रीय शिक्षणाच्या संधी, योगा, अध्यात्म यांसारख्या संधी उपलब्ध करत २००० सालापासून पुराणिक फाउंडेशनच्या संस्थापक सौ. पुराणिक वंचित मुलांचे आयुष्य, शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याकरिता अथक परिश्रम घेत आहेत. श्री. पुराणिक तेल आणि गॅसचा व्यापार करत असून वर्ल्डवाइड ऑइलफील्ड मशीन (डब्लूओएम) नावाची बहुराष्ट्रीय संस्था चालवतात. पुराणिक घराण्याच्या तीनही पिढ्या या फाउंडेशनचे काम बघतात.
इम्पॅक्ट इंडिया : इम्पॅक्ट इंडिया हा प्रोग्राम अमेरिकेतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आला, ह्यात विदेशी विद्यार्थ्यांना समर्थगड येथे राहावयास येवून विविध सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याच्या संधी मिळतात. विदेशात देखील भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी म्हणून पुराणिक फाउंडेशनने १० दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. भारतीय सण, संस्कृती, लोकनृत्य, कला, भाषा यांसारख्या कित्येक बाबींशी ओळख करून देण्याचा मानस पुराणिक फाउंडेशनचा आहे.