Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

वृत्तपत्र आणि नियतकालिके नोंदणी विधेयक लोकसभेत मंजूर..काय आहे बदल घ्या जाणून

Date:


नवी दिल्‍ली, 21 डिसेंबर 2023 

एका ऐतिहासिक निर्णयात, लोकसभेने आज वृत्तपत्र आणि नियतकालिके नोंदणी विधेयक 2023 मंजूर केले आणि वसाहतवादी युगातील प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ बुक्स कायदा, 1867 रद्द केला.  हे विधेयक पावसाळी अधिवेशनात राज्यसभेने आधीच मंजूर केले आहे.

नवीन कायदा – वृत्तपत्र आणि नियतकालिके नोंदणी विधेयक, 2023  मध्ये कोणत्याही प्रत्यक्ष हस्तक्षेपाशिवाय ऑनलाइन प्रणालीद्वारे नियतकालिकांचे शीर्षक वितरण  आणि नोंदणी  प्रक्रिया सोपी आणि एकाच वेळी करण्याची तरतूद आहे. यामुळे प्रेस रजिस्ट्रार जनरलला प्रक्रियेचा जलदतेने मागोवा घेता येईल, ज्यामुळे प्रकाशकांना, विशेषत: छोट्या आणि मध्यम प्रकाशकांना आपले  प्रकाशन सुरू करण्यात फारशी अडचण येणार नाही.  सर्वात महत्त्वाचे म्हणजे, प्रकाशकांना यापुढे जिल्हा दंडाधिकारी किंवा स्थानिक प्राधिकरणांकडे घोषणापत्र दाखल करण्याची आणि त्याचे  प्रमाणीकरण करण्याची आवश्यकता नाही.

लोकसभेत विधेयक सादर करताना, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर म्हणाले, “गुलामगिरीची मानसिकता दूर करण्यासाठी आणि नवभारतासाठी नवीन कायदे आणण्याच्या दिशेने हे विधेयक म्हणजे,  मोदी सरकारने उचललेले हे आणखी एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचे  या विधेयकातून प्रतिबिंबित होते”. तसेच प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली एका विश्वासार्ह अपीलीय यंत्रणेची तरतूद यात  करण्यात आली आहे. व्यवसाय सुलभतेवर भर देताना  ठाकूर म्हणाले की, शीर्षक नोंदणी प्रक्रियेला कधीकधी  2-3 वर्षे लागतात, ती आता 60 दिवसांत पूर्ण केली जाईल.

अनुबंधन-

वृत्तपत्रे आणि नियतकालिक नोंदणी विधेयक 2023 मधील काही ठळक वैशिष्ट्ये:

  • हे विधेयक मालकी हक्क पडताळणीसाठी अर्ज करणे तसेच प्रेस रजिस्ट्रार जनरल यांच्याकडून नियतकालिकाला नोंदणी प्रमाणपत्र जारी करणे या बाबी एका साध्या ऑनलाईन यंत्रणेच्या मदतीने एकाच वेळी होणारी प्रक्रिया म्हणून सोय करून देते.
  • केंद्र सरकारची पूर्व परवानगी घेऊन तसेच प्रेस रजिस्ट्रार जनरल यांच्याकडून नोंदणी केल्यानंतर एखाद्या परदेशी नियतकालिकाच्या नक्कल आवृत्तीची भारतात छपाई करता येईल.
  • नियतकालिक छापणाऱ्याने प्रेस रजिस्ट्रार जनरल आणि स्थानिक अधिकाऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने माहिती देणे आवश्यक असणार आहे.
  • या विधेयकामध्ये नोंदणी प्रमाणपत्र आणि मालकीहक्क वितरण यांच्या मंजुरीसंदर्भात जिल्हा दंडाधिकारी / स्थानिक अधिकारी यांची भूमिका कमीतकमी असेल अशी संकल्पना मांडली  आहे.

वृत्तपत्रे तसेच पुस्तके नोंदणी कायदा 1867 आणि वृत्तपत्रे तसेच नियतकालिक नोंदणी विधेयक 2023 यांच्यातील फरक

  • पीआरबी कायदा 1867 चा भाग असलेल्या पुस्तकांना पीआरपी विधेयक 2023च्या कार्यक्षेत्राच्या बाहेर ठेवण्यात आले आहे, कारण पुस्तके हा विषय केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाच्या अखत्यारीत ठेवण्यात आला आहे. 
  • ज्यावेळी एखादे नियतकालिक नोंदणी प्रमाणपत्राशिवाय छापले जात असेल आणि प्रेस रजिस्ट्रार जनरल यांच्याकडून छपाई थांबवण्याचे निर्देश दिल्यानंतर सहा महिन्यांचा काळ उलटल्यावर देखील प्रकाशक अशा प्रकाशनाची छपाई थांबवण्यात अयशस्वी झाल्याचे निदर्शनास आले असेल तर, अशा तीव्र कायदेभंगाच्या प्रकरणात आरोपींना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद 2023 च्या विधेयकात करण्यात आली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

हडफडे नाईटक्लब आग प्रकरण: अधिकारी निलंबित, चौकशीला गती; मुख्यमंत्र्यांचे कडक कारवाईचे आदेश

गोवा पोलिसांचे पथक दिल्लीला रवाना, सर्व पर्यटन आस्थापनांचे सुरक्षा...

कंत्राटदारांच्या प्रश्नावर संसदेच्या अधिवेशनानंतर पुण्यात बैठक

शरद पवार यांचे सुनील माने यांना आश्वासननवी दिल्ली :...

पुण्यातील उत्तर प्रदेशीय भामट्या रिक्षाचालकाला दिल्लीत जाऊन पकडला..

बाणेरमध्ये एकाला रिक्षाने उडवलं, उपचाराच्या बहाण्याने नेलं ,पण ...