पुणे- नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच देशातील भव्य राममंदिराचं उद्धाटन होणार आहे. पण तत्पूर्वीच स्रियांप्रतीच्या रामाच्या न्यायिक भूमिकेतून रामराज्याप्रमाणेच आपल्या या मोदीराज्यात लिहिली जातेय… नव्या कायद्यांची नवी परिभाषा..असे भाजपा,महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा किशोर वाघ यांनी म्हटले आहे. महिला ,मुलीवर होणाऱ्या अत्याचाराबाबत देखील होणाऱ्या कायदे बदलांचे देखील त्यांनी स्वागत करत सरकारचे जोरदार अभिनंदन केले आहे .
चित्रा वाघ यांनी नेमके काय म्हटले आहे ते वाचा आणि ऐका त्यांच्याच शब्दात
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच देशातील भव्य राममंदिराचं उद्धाटन होणार आहे. पण तत्पूर्वीच स्रियांप्रतीच्या रामाच्या न्यायिक भूमिकेतून रामराज्याप्रमाणेच आपल्या या मोदीराज्यात लिहिली जातेय… नव्या कायद्यांची नवी परिभाषा..
हा नवा भारत खऱ्या अर्थाने सुदृढ आणि सुव्यवस्थित करण्यासाठी १५० वर्ष जुन्या कायद्यांमध्ये योग्य तो बदल करून समाजाच्या सुलभ कायदेव्यवस्था व सुरक्षिततेसाठी नवे आणि अधिक कठोर कायदे बनवले जात आहेत.
देशाच्या सर्वांगीण विकासाच्या व सुदृढ लोकशाही व्यवस्थेच्या प्रक्रियेचा भाग असल्याचा सार्थ अभिमान वाटतोय..
कारण समाजात स्रियांच्या अन्याय- अत्याचारा विरोधात त्यांना निःपक्षपाती, स्वच्छ, स्पष्ट आणि तितकाच जलद न्याय मिळावा यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाच्या तीन कायद्यांमध्ये बदल करत त्या कायद्यांची नवी परिभाषा मांडली आहे.
या नव्या कायद्यांनुसार महिलांविरोधातील अन्याय- अत्याचाराच्या घटनेत आता गुन्हेगाराला कसलीच माफी नसेल ना असेल कायद्याची पळवाट…
समाजातील पाशवी प्रवृत्तींना कायमचाच चाप बसावा यासाठी बदललेल्या कायद्यानुसार आता…
- गॅंगरेप (सामूहिक बलात्कार) च्या गुन्ह्यांत २० वर्षांची शिक्षा किंवा जन्मठेपेची शिक्षा
- १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींच्या प्रकरणांमध्ये जन्मठेप किंवा फाशीचीच शिक्षा
- खोटी आश्वासने देऊन किंवा ओळख लपवून लैंगिक संबंध ठेवल्यास हा देखील आता गुन्हाच असेल.
स्रियांबाबत धाडसी आणि संवेदनशील अशा केंद्र सरकारच्या- आमच्या मोदी सरकारच्या आपल्या मोदी सरकारच्या या निर्णयाचे खूप खूप अभिनंदन आणि समस्त महाराष्ट्रातील मातृशक्तीकडून आभार
चित्रा किशोर वाघ*
भाजपा,महिला प्रदेशाध्यक्ष

