पुणे-खासदार सुप्रियाताई सुळे आणि डॉ.अमोल कोल्हे यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज आंदोलन करण्यात आले. आज सकाळी 9 वाजता वारजे उड्डानपुलाखाली हे आंदोलन घेण्यात आले. यावेळी मोदी सारकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
एकिकडे जनतेचे प्रश्न सभागृहात मांडले म्हणून “महासंसदरत्न” पुरस्कार जाहीर होतो. तर, दुसरीकडे जनतेचे प्रश्न मांडले व सरकारची कोंडी केली म्हणुन खासदारांचे निलंबन करून लोकशाहीची हत्या केली जाते, असा आरोप पुणे शहर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला.
“लोकशाहीच्या पवित्र मंदिरात, म्हणजेच संसदेत जनतेच्या मूलभूत प्रश्नांविषयी शेतकऱ्यांच्या हक्कांविषयी आवाज उठवणारे संसदरत्न खासदार सौ. सुप्रियाताई सुळे व संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना निलंबित करून मोदी सरकारने हुकूमशाहीचा प्रमुख गाठला आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा हुकूमशाहीच्या दिशेने सुरू असलेला हा प्रवास वेदनादायी असून, देशाच्या स्वातंत्र्यासाठी लोकशाहीसाठी बलिदान दिलेल्या सर्व स्वातंत्र्यवीरांचा, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा व संसदेचा हा घोर अपमान आहे. या आंदोलनाला लाभलेला प्रतिसाद पाहता मोदी सरकारची हुकूमशाही मुळापासून नष्ट करण्याचा आपला लढा अधिक तीव्र करण्याचे बळ आपल्याला मिळेल हा विश्वास दृढ झाला आहे.” अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.
या आंदोलनाला पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत जगताप, काकासाहेब चव्हाण, स्वप्नील दुधाणे,डॉ. सुनील जगताप, गिरीश गुरणानी, किशोर कांबळे, मनाली भिलारे, शरद दबडे, सुरेश गुजर, ज्योतीताई सूर्यवंशी तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

