सह्याद्री हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ७ वर्षाच्या मुलाची श्वसन आणि कोविड-19 च्या गंभीर आव्हानांवर मात

Date:

पुणे, 19 डिसेंबर २०२३: मुलांमध्ये आढळणारा मल्टीसिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोम (MISC) सारखी लक्षणे आणि गंभीर श्वसनविषयक परिस्थिति असलेल्या ७ वर्षाच्या मुलाला बालरोग अतिदक्षता विभाग (PICU) मध्ये दाखल केल्यानंतर आता त्या मुलाच्या तब्बेतीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. 

या लहान वयातील रुग्णाला सुरुवातीला ताप, पुरळ, पोटात दुखणे आणि जलद श्वासोच्छवासाचा त्रास जाणवला आणि त्यातून गंभीर चिंता निर्माण झाली. हडपसरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले तेव्हा त्याचा रक्तदाब खूप कमी झाला होता. जोडीला प्रचंड अशक्तपणा आणि प्लेटलेटची संख्या कमी होती. इंट्राव्हेनस फ्लुइड्स आणि कोलाइड तपासणी यासह तत्काळ वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले. पुढील उपचारांमध्ये आयनोट्रॉपिक सपोर्ट, पॅक्ड सेल व्हॉल्यूम (पीसीव्ही) ट्रान्सफ्यूजन आणि डेंग्यू आणि टायफॉइड सारख्या संसर्गजन्य आजारांसाठी कठोर तपासणी यांचा समावेश होता.

एवढ्या परिपूर्ण, सर्वसमावेशक तपासण्या करूनही नेमके विशिष्ट कारण अस्पष्ट राहिले. उच्च ऑक्सिजनची आवश्यकता आणि दाहक मार्कर वाढल्यामुळे मुलांमधील मल्टीसिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोम (MISC) चे निदान झाले. COVID-19 शी संबंधित असण्याची शक्यता होती. वैद्यकीय पथकाने रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवून IVIG आणि स्टिरॉइड्स दिली. आयसीयू मध्ये जवळजवळ १० दिवसांनंतर, सर्वसाधारण ऑक्सिजन पातळी येऊन रुग्णामध्ये लक्षणीय सुधारणा दिसून आली. हायपोटेन्शन, श्वसनाचा त्रास, उच्च कार्डियाक मार्कर (PROBNP), कोविड IgG चाचणीसह दीर्घकाळापर्यंत कोग्युलेशन मार्कर यांनी MISC ची पुष्टी केली आणि सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर, पुणे येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. गणेश बडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू केले. डॉ. बडगे म्हणाले, “या रुग्णाच्या केसमध्ये विविध प्रकारची लक्षणे दिसत असल्यामुळे एक वेगळेच आव्हान निर्माण झाले होते.  तज्ञांमधील सहकार्य आणि पुरवली गेलेली सर्वसमावेशक काळजी हा सकारात्मक परिणाम साध्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली.”

रुग्णाची प्रकृती अधिक बिघडली असल्यामुळे स्टेरॉईड्स आणि इंट्राव्हेनस इम्युनोग्लोब्युलिन (IVIG) पदेण्यात आले. वेंटिलेशनचे पाच दिवस आव्हानात्मक होते. रुग्णाला आराम मिळावा, त्याच्या तब्बेतीत सुधारणा व्हावी या साठीच्या प्रवासात आत्यंतिक काळजी अंतर्भूत होती. फुफ्फुसाच्या जळजळीमुळे रुग्णाला गंभीर एआरडीएसचा (ARDS) (तीव्र श्वसनचा त्रास) होत होता. त्यात PEEP टायट्रेशन, रिव्हर्स IE गुणोत्तर प्रयत्न आणि निगेटिव्ह द्रव संतुलन साधणे यांचा समावेश होता. ४८ तासांनंतर, सुधारणेची चिन्हे स्पष्ट झाली. अधिक चांगले आर्टीअल ब्लड गॅस परिणाम आणि एक्स-रे प्रतिमांमधून हे दिसून आले.

मुलाला तीव्र वेंटिलेशनमधून सिंक्रोनाइझ्ड इंटरमिटंट मॅन्डेटरी व्हेंटिलेशन (SIMV) मोडमध्ये आणि त्यानंतर, हाय-फ्लो नेसल कॅन्युला (HFNC) मध्ये यशस्वीरित्या आणण्यात आले. सध्या सुरू असलेल्या आरोग्य विषयक सेवेत संपूर्ण बरे वाटण्यासाठी सर्वांगीण दृष्टिकोनावर भर देत ओरल आणि फिजिओथेरपीचा समावेश आहे. दोन आठवड्यांच्या समर्पित वैद्यकीय सेवेनंतर छान बरे वाटलेल्या या   रुग्णाला कोणत्याही गुंतागुंतीशिवाय रुग्णालयातून सोडण्यात आले. सह्याद्री हॉस्पिटल्समधील या प्रेरणादायी केसमधून बालरोगाच्या गंभीर परिस्थितीत त्वरित आणि पूर्ण काळजी घेण्याची किती आवश्यकता असते हे दिसून आले. लहान वयाच्या रुग्णाच्या तब्बेतीत पूर्णपणे सुधारणा होण्यात डॉ. गणेश बडगे यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय कर्मचार्‍यांचे टीमवर्क हा महत्त्वाचा घटक होता.

मुलांमधील मल्टीसिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम समजून घेणे (MIS-C): MIS-C ही कोविड-19 नंतर मुलांमध्ये दिसून येणारी एक दुर्मिळ परंतु गंभीर गुंतागुंत आहे. जेव्हा रोगप्रतिकारक शक्ती जास्त प्रतिक्रिया देते, शरीरावर हल्ला करते आणि मोठ्या प्रमाणावर जळजळ हा त्रास होतो तेव्हा असे होते. शरीराच्या वेगवेगळ्या प्रणालींवर परिणाम करणारी लक्षणे दिसून येतात. या प्रकारच्या रुग्णांची संख्या कमी झालेली असली तरी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कोविड-19 असलेल्या मातांच्या पोटी जन्मलेली नवजात मुले आता MIS-C ची लक्षणे दाखवत आहेत. त्यामुळे नियमित अँटीबॉडी तपासण्यांशिवाय निदान आव्हानात्मक होते. विशेषत: नवजात मुलांमध्ये MIS-C समजून घेण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठी सातत्यपूर्ण संशोधन महत्त्वाचे आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

BIS-ER प्रमाणित स्मार्ट सिक्युरिटी कॅमेरे आणि नियमांचे पालन करणाऱ्या सुरक्षा प्रणालींच्या माध्यमातून गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपने ग्राहक-केंद्रित सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट केली

मुंबई, 15 जून, 2026: भारतातील सुरक्षा उपायांमधील प्रमुख, वाय-फाय आणि 4G-सक्षम सीसीटीव्ही कॅमेरे यांचा नवीन पोर्टफोलिओ लॉन्च करून गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या (GEG) सिक्युरिटी सोल्युशन्स बिझनेसने ग्राहक-केंद्रित, कनेक्टेड सुरक्षा अनुभव प्रदान करण्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. गोदरेजच्या भारताच्या वेगाने विकसित होत असलेल्या पाळत ठेवण्याच्या संघटित बाजारपेठेतील वाढीचा पुढचा टप्पा हा धोरणात्मक विस्तार दर्शवितो, ज्यामध्ये नावीन्य, डिझाइन आणि एकात्मिक सुरक्षा अनुभवांवर भर दिला जातो. उत्पादन-नेतृत्व स्वीकारण्यापासून ते अनुभवावर आधारित निर्णय घेण्यापर्यंत भारताच्या निगराणी मार्केटमध्ये मूलभूत बदल होत आहेत. निवासी, व्यावसायिक आणि संस्थात्मक विभागातील ग्राहक वाढत्या प्रमाणात उपाय शोधत आहेत ज्यात वापर सुलभता, विश्वासार्हता, डेटा सुरक्षितता आणि नियामक अनुपालनासह, अखंड कनेक्टिव्हिटी आणि नियंत्रण यांचा समावेश आहे. विश्वसनीय, संघटित खेळाडूंच्या मागणीला हे संक्रमण गती देत​​आहे जे एकात्मिक, भविष्यासाठी तयार सुरक्षा उपाय देऊ शकतात. लाँचबद्दल भाष्य करताना, श्री. पुष्कर गोखले, बिझनेस हेड - सिक्युरिटी सोल्युशन्स, गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुप, म्हणाले: "भारतातील cctv निगराणी श्रेणी सध्या अत्यंत महत्त्वपूर्ण वळणावर आहे, ज्याचे मार्केट येत्या काही वर्षात INR 1000 कोटींहून अधिक होण्याचा अंदाज आहे. ग्राहकांच्या अपेक्षा विश्वासार्ह आणि सुरक्षित अशा उपायांकडे वेगाने विकसित होत आहेत. आम्ही सुरक्षिततेकडे एक स्वतंत्र उत्पादन म्हणून पाहात नाही, तर एकात्मिक अनुभव म्हणून पाहातो, ज्यामुळे मनावर नियंत्रण, शांतता आणि सहजतेने वाढ होते. विश्वासार्ह, भारतीय उत्पादित सोल्यूशन्सला प्राधान्य जे गुणवत्ता, डेटा सुरक्षा आणि नियामक अनुपालनाची अधिक खात्री देतात, आमचा "भारतात उत्पादित" पोर्टफोलिओ या बदलाला प्रतिबिंबित करतो, नावीन्य, मजबूत अभियांत्रिकी आणि जागतिक मानकांचे पालन करणे, हे आमच्या ग्राहकांसाठी सुरक्षित परिसंस्था निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे आहे." नव्याने लाँच केलेल्या पोर्टफोलिओमध्ये वायफाय आणि 4G सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची विस्तृत श्रेणी आहे ज्यामध्ये इनडोअर सिक्युरिटी कॅमेरा आणि आउटडोअर पॅन-टिल्ट, डोम आणि बुलेट कॅमेरे यांचा समावेश आहे. विविध ग्राहकांच्या गरजा समजून घेऊन डिझाइन केलेली, श्रेणी शहरी आणि दुर्गम अशा दोन्ही वातावरणात लवचिक आणि सातत्यपूर्ण देखरेखीची सोय करते. घरे आणि व्यवसायांना वाय-फाय व्हेरिएंट कनेक्टेड पुरवतात, तर स्मार्ट कॅमेरे आणि सोलर कॅमेरासह 4G-सक्षम कॅमेरे ज्या ठिकाणी ब्रॉडबँड पायाभूत सुविधा मर्यादित किंवा उपलब्ध नाही, अशा ठिकाणी त्या सातत्याने लक्ष ठेवतात, ज्यामुळे वापरकर्त्यांना कधीही, कुठेही कनेक्ट राहता येते. भारतात उत्पादित आणि BIS-ER मानकांनुसार प्रमाणित हा पोर्टफोलिओ गुणवत्ता, डेटा सुरक्षा, अनुपालन तसेच ग्राहकांच्या विश्वासासाठी गोदरेजची वचनबद्धता अधोरेखित करतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, लॉन्च कंपनीच्या स्टँडअलोन उत्पादनांपासून सर्वांगीण कनेक्टेड सुरक्षा इकोसिस्टममध्ये झालेल्या उत्क्रांती प्रतिबिंबित करते, जेथे कौशल्याने पाळत ठेवणे हे उपयोगिता, प्रवेशयोग्यता आणि एकूण ग्राहक अनुभव वाढवते. विश्वासार्ह तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी, स्थानिक उत्पादन आणि ग्राहक-प्रथम डिझाइन दृष्टिकोन एकत्र आणून, गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपचे उद्दिष्ट आहे की, सुरक्षितता अधिक अंतर्ज्ञानी, विश्वासार्ह आणि कनेक्टेड जगाच्या गरजांशी जोडली जाते. सुरक्षित, सुसंगत आणि वापरण्यास सोप्या पाळत ठेवण्याच्या उपायांची मागणी वाढत असताना, GEG भारताच्या संघटित आणि स्वावलंबी सुरक्षा इकोसिस्टमला भक्कम करताना दैनंदिन सुरक्षा अनुभव वाढवणाऱ्या नावीन्यपूर्णतेवर लक्ष केंद्रित करते.

लंका प्रीमियर लीगचे प्रमोटर’आयपीजीग्रुप’ ची मोठी घोषणा; नॅसडॅकलिस्टेड भागीदाराकडून मिळाला कोट्यवधी डॉलर्सचा धोरणात्मक निधी

या निधी आणि भागीदारीमुळे लंका प्रीमियर लीगला जगभरात प्रसिद्धी वाढवण्याची संधी मिळेल, लीगचे उत्पन्न अनेक पटींनी वाढेल आणि क्रिकेटप्रेमींसाठी मॅचेस पाहण्याचा अनुभव डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक आधुनिक व रंजक बनवला जाईल. कोलंबो, श्रीलंका - १५ जून, २०२६:  लंका प्रीमियर लीगच्या (एलपीएल) सहाव्या हंगामाची सुरुवात १० जुलैपासून होणार आहे. या स्पर्धेच्या अगदी काही दिवस आधीच लीगला कोट्यवधी डॉलर्सचे मोठे आर्थिक बळ मिळाले आहे. लंका प्रीमियर लीगचे प्रमोटर 'इनोवेटिव प्रॉडक्शन ग्रुप' (Innovative Production Group FZ, LLC - IPG) या कंपनीला अमेरिकेतील, शेअर बाजारात नोंदणीकृत असलेल्या कंपनीकडून हा मोठा आर्थिक निधी मिळाला आहे. आयपीजी कंपनीने अमेरिकेच्या 'फ्लॅश स्पोर्ट्स अँड मीडिया' (Flash...

मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा मेघराज राजेभोसले,खजिनदारपदावर सुनील महाजन

नूतन कार्यकारी संचालक मंडळाचीही घोषणा पुणे : अखिल भारतीय मराठी...