Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

राहुल गांधींची भूमिका संविधान ‘बचाओ’ची; संविधान वाचवणे भाजपा, फडणवीसांना शहरी नक्षलवाद वाटतो का?: नाना पटोले

Date:

संविधानाच्या पुस्तकाचा रंग कोणता असावा हे ठरवण्याचा अधिकार संविधानविरोधी लोकांना नाही.

राहुल गांधींच्या पहिल्याच सभेने भाजपा घाबरली, भाजपाच्या शक्ती स्थळाजवळच कार्यक्रम घेतल्याने जळफळाट.

मुंबई, दि. ६ नोव्हेंबर २०२४
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नागपुर मधील पहिल्याच कार्यक्रमाने भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीसांची पळता भुई थोडी झाली असून घाबरलेल्या फडणवीसांचे ताळतंत्र सुटल्याने ते राहुल गांधींवर खोटे नाटे आरोप करून बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदु धर्मात लाल रंग शुभ मानला जातो पण भाजपाला तो ही अपवित्र वाटू लागला आहे. संविधानाच्या पुस्तकाचा रंग लाल, पिवळा का काळा असावा हे ठरविण्याचा अधिकार संविधान विरोधी लोकांना नाही. संविधान वाचवणे भाजपा व फडणविसांना शहरी नक्षलवाद वाटतो का? भारत जोडो यात्रेत राहुलजींसोबत चालणारी मराठी माणसे शहरी नक्षलवादी आहेत का असा सवाल विचारून देवेंद्र फडणवीसांनी भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील सर्व नागरिकांची माफी मागावी असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राहुल गांधी संविधान ‘बचाओ’ची भूमिका हाती घेत संविधानाचे पुस्तक दाखवत असतात. ज्या लोकांनी आरक्षण व संविधानाला विरोध केला, संविधान जाळले त्या व्यवस्थेच्या बाजूला भाजपाच्या शक्तीस्थळाजवळच सुरेश भट्ट सभागृहात राहुल गांधींचा संविधान संमेलन कार्यक्रम झाला, त्यामुळे भाजपाचा जळफळाट झाला आहे. भाजपाला डाव्या विचारसरणीचे लोक देशाचे विरोधक वाटत असतील तर केरळमध्ये डाव्या पक्षाचे सरकार आहे, पश्चिम बंगालमध्ये अनेक वर्षे डाव्या पक्षांचे सरकार होते, देशात आजही डाव्या पक्षाचे आमदार, खासदार आहेत, त्यांना मतदान करणारे देशविरोधी आहेत का? आणि भाजपाला तसे वाटत असेल तर केंद्रात त्यांची सत्ता आहे फडणविसांनी कारवाई करावी. कोणालाही देशभक्तीचे किंवा देश विरोधाचे सर्टिफिकेट देण्याचा अधिकार भाजपाला कोणी दिला.
भाजपाची सर्वात मोठी अडचण राहुल गांधी हे आहेत, भाजपा राहुल गांधी यांना घाबरतात म्हणून मनुवादी विचारसरणीचे हे लोक त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत पण राज्यातील जनता सुज्ञ आहे भाजपाला ते त्यांची जागा दाखवतील, असेही नाना पटोले म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

माळेगाव कारखाना:अजित पवार यांचाच दबदबा

पुणे/बारामती माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार...

पुण्यात भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग

अधिक माहिती घेतली असतामहिला वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा विनयभंग करणाऱ्या...

अकरावी प्रवेश: निवड यादी गुरुवारी

पुणे-इयत्ता अकरावीच्या प्रवेशाच्या प्रक्रियेतील पहिल्या नियमित 'कॅप' फेरीतील निवड...

उद्या धनकवडीत पाणी पुरवठा बंद —

पुणे-आंबेगाव फाटा, धनकवडी येथे स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे...