पुणेकरांची सुरक्षितता आणि कला संस्कृतीचा अनोखा मेळावा
पुणे-दिनांक १८/१२/२०२३– कलावंताच्या भेटीगाठी सह ..ढोल ताशा आणि बँड पथकाची जुगलबंदी , ऑर्केस्ट्रा अशा कार्यक्रमांचा समावेश असलेल्या संस्कृती, कला अविष्कार आणि पुणेकरांच्या सुरक्षिततेसाठी पुणे पोलीस दलाच्या विविध विभागांच्या कार्याची झलक यांचा संगम घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘तरंग २०२३ ‘ या अनोख्या मेळाव्याचे पुणे पोलिसांनी आयोजन केले आहे. अर्थात पुण्याची खाऊ गल्ली हि येथे असणार आहे. पोलीस आणि पुणेकर यांच्यातीलविश्वासाचे नाते अधिक घटत व्हावे या उद्देशाने पुणे पोलीस या कार्यक्रमाचे आयोजन करत आहे.
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे वतीने पोलीस आयुक्त रितेश कुमार यांचे संकल्पनेतुन पोलीस दलातील विविध शाखा, घटक यांची परिपुर्ण माहिती जनमाणसातील सर्व सामान्य नागरीकांना अवगत व्हावी. तसेच पोलीस व जनता यांचेमध्ये सौदाहर्याचे वातावरण तयार व्हावे. यादृष्टीकोनातुन पुणे शहर पोलीस आयुक्तालय यांनी तरंग-२०२३ या मनोरंजनपर कार्यक्रम सोहळयाचे दिनांक २२/१२/२०२३ ते दिनांक २४/१२/२०२३ रोजी या कालावधीत पोलीस मुख्यालय, शिवाजीनगर, पुणे याठिकाणी सकाळी ११/०० ते रात्रौ २२/०० वा. पर्यंत आयोजन केलेले आहे.
या कार्यक्रम सोहळ्याचे मुख्य आकर्षण हे पोलीस घटकांचे प्रदर्शन त्यामध्ये पोलीस दलातील विविध शाखा व त्या शाखांमधील चालणारे कामकाज याविषयी ऑडीयो / व्हिडीओच्या माध्यमांतुन माहिती सांगण्यात येणार आहे. त्यामध्ये पोलीस दलातील भरोसा सेल, दामिनी पथक हे महिलांचे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन यशस्वी कार्यरत आहेत. त्याप्रमाणे डायल ११२, राज्य राखील बल, दळणवळण संदेश वाहन यंत्रणा, डॉग शो, जलद प्रतिसाद पथक, राज्य गुन्हे अन्वेषण कार्यप्रणाली व इतर घटकांची परिपुर्ण माहिती त्यांचे कामकाज याबद्दलची माहिती प्रदर्शनात असणार आहे.
सांस्कृतिक कलेचा वारसा असणारे पुणे शहरातील स्थानिक कलाकार यांची कलाकृती (Artison Gallery) या शिर्षकाखाली सर्व सामान्यांसाठी प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्यामध्ये पुण्यातील स्थानिक कलाकार मातीची भांडी कलाकृती, पर्यावरणपुरक प्लास्टिक पदार्थाचे पुर्नप्रकल्पाने उपयोगी वस्तु, तांबे पितळ या भांडयाचे प्रदर्शन, तसेच फुलेझाडे, रोपवाटीका यांचे पदर्शन असणार आहे.
नविन पिढी, लहान बालके यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी म्हणुन विज्ञात प्रदर्शन, मुलांसाठी खेळप्रकार, व्हिडीओचे माध्यमांतुन लहान बालकांसाठी गुड टच, बॅड टच यासारखे प्रबोधनपर प्रदर्शन ‘किड्स झोन’ चे माध्यमांतुन प्रदर्शित करण्यात येणार आहे.
समाजातील सर्व घटकांचे या कालावधीत मनोरंजन व्हावे आणि पोलीस व जनता यांचेत सुसंवाद व्हावा या दृष्टीकोनातुन वाद्यवृंद (ऑकेस्ट्रा ) आणि मराठी सिनसृष्टीतील हास्य कलाकार इतर सेलीबेट्री यांचे विविध कार्यक्रमांचा समाविष्ट करण्यात आला आहे.
या सर्व मनोरंजना बरोबरच खाद्य संस्कृतीचेही स्टॉल प्रदर्शनात असणार आहे. भारतातील विविध कलाकुसर, खादी, दाग-दागिने, देशी पदार्थ, कपडयाचे प्रदर्शन या विविध वस्तुंचे प्रदर्शन सदर मेळाव्याकरीता पोलीस खात्यामधील वरिष्ठ अधिकारी, निमसरकारी अधिकारी, स्थानिक कलाकार आणि कल्पक व दर्जेदार कारागीर उपस्थित राहणार आहेत.
तरी नागरीकांनी तरंग मेळावा २०२३ या सोहळया मध्ये उत्स्फुर्तपणे सहभागी होवुन, कुशल कारागिर यांनी बनविलेल्या विविध वस्तु, खाद्य पदार्थ यांचा आस्वाद घेता येईल.तरी पुणे शहरातील नागरीकांनी तरंग मेळाव्याचा लाभ घ्यावा असे पुणे शहर पोलीस आयुक्तालयातर्फे आवाहन करण्यात आले आहे.
सर्वासाठी तरंग मेळावा २०२३ या सोहळ्यासाठी मोफत प्रवेश असणार आहे.