सिद्धार्थ आनंदचा एरियल अॅक्शन ड्रामा फायटर हा 2024 चा सर्वात अपेक्षित चित्रपट ठरणार आहे. सिद्धार्थ आनंद आणि हृतिक रोशन ही डायनॅमिक जोडी तिसऱ्यांदा पुन्हा एकदा या चित्रपटात दिसणार आहे. एक उत्तम दिग्दर्शक-अभिनेता असलेली ही जोडी आता काय नवीन घेऊन येणार हे बघण उत्सुकतेच ठरणार आहे. सिद्धार्थ आनंद आणि हृतिक रोशन ने या आधी अनेक अफलातून प्रोजेक्ट्स केले.
Bang Bang (2014) आणि वॉर (2019) या दोन ब्लॉकबस्टर नंतर आता फायटर येणार आहे. ही डायनॅमिक जोडी कायम एकत्र काम करून धमाकेदार प्रोजेक्ट करते आणि प्रत्येक वेळी ते एकत्र येतात तेव्हा मोठ्या पडद्यावर जादू निर्माण करतात. हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ अभिनीत 2019 मध्ये रिलीज झालेल्या वॉरने बॉक्स ऑफिसवर 475 कोटींहून अधिक कमाई केली तर हृतिक रोशन आणि कतरिना कैफ अभिनीत बँग बँगने 330 कोटींहून अधिक कमाई केली.
त्यांच्यात काय साम्य आहे ते म्हणजे या दोघांचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केले होते. फायटर बद्दल देखील व्यापार विश्लेषक तसेच नेटिझन्स हॅट्रिकची अपेक्षा करत आहेत. सिद्धार्थ आनंदने फायटरमधील त्याच्या पात्रांसाठी बिग बँग प्लॅन केला आहे आणि फायटर 25 जानेवारी 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज होत आहे.

