दुबईतील चौथ्या आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलनाचे उद्घाटन करणार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस

Date:

पुणे: दुबई येथे होणाऱ्या चौथ्या आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक व माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस करणार आहेत. जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ, मिलिंद महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर आणि दीपस्तंभ सांस्कृतिक संघ सांगली या संस्थांच्या वतीने येत्या ७ व ८ नोव्हेंबर २०२४ रोजी या संमेलनाचे दुबई येथे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष डॉ. दीपककुमार खोब्रागडे यांनी दिली आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, विश्व साहित्य संमेलन, आदिवासी, मुस्लिम, बालसाहित्य संमेलन अशा एकूण ५३ संमेलनाचे अध्यक्षपद डॉ. श्रीपाल सबनीस यांनी भूषविले आहे, तर ४१ पेक्षा अधिक संमेलनाचे उद्घाटक म्हणून त्यांनी भूमिका बजावली आहे. यासह डॉ. श्रीपाल सबनीस यांचे ७६ ग्रंथ प्रकाशित झाले असून, महाराष्ट्रातील विविध प्रवाहातील लेखकांच्या ४५२ पुस्तकांना प्रस्तावना दिल्या आहेत. अशा समग्र साहित्यिकाच्या हस्ते चौथ्या आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणे, ही अभिमानास्पद गोष्ट असल्याचे डॉ. खोब्रागडे यांनी नमूद केले.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, “विश्व स्तरावर होत असलेला साहित्याचा जागर भारताच्या बंधुभावाची ओळख करून देणारा आहे. कंबोडिया, थायलंड येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविल्यानंतर आता दुबईतील आंबेडकरवादी संमेलनाचे उद्घाटन करण्याचे भाग्य मला लाभले, याचा आनंद वाटतो. विवेकाची, चांगुलपणाच्या बेरजेची माझी भूमिका असून, जागतिक स्तरावर ती अधिक प्रभावीपणे मांडण्याचा माझा प्रयत्न राहील.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विशेष फुटपाथ दुरुस्ती अभियानाचे उद्घाटन

क्षेत्रीय कार्यालयांमध्ये 'जागल्या' संकल्पना राबविण्यात येणारपुणे- पुणे महानगरपालिका पथ...

श्री पूज्य गुरुदेवश्री राकेशजी यांच्या परिवर्तनकारी सत्संगाचे पुण्यात आयोजन…..

पुणे - श्रीमद् राजचंद्रजी यांचे भक्त,आध्यात्मिक मार्गदर्शक,आणि आत्मज्ञानी गुरु...

महिलाच्या आर्थिक सक्षमीकरणाला एआयची जोडमिळाल्यास त्यांचा शाश्वत विकास शक्य-विजया रहाटकर

‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट-2026’मध्ये महिला समृध्दीचा निर्धार नवी दिल्ली, दि....

महापौर मंजुषा नागपुरे, धीरज घाटे आणि दुष्यंत मोहोळ यांच्यावर गुन्हे दाखल का केले नाही? काँग्रेसचा सवाल

कॉंग्रेस भवनवर मोर्चा आणला त्यांनी ,चिथावणी देऊन आपल्या कार्यकर्त्यांना...