महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशन तर्फे आयोजन ; निवृत्त पोलीस अधिकारी प्रतिभा जोशी यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे : महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशन तर्फे राज्यातील महिला उद्योजकांना व्यासपीठ मिळावे, यासाठी ‘एमएलए नवरात्र उत्सव प्रदर्शना’ चे आयोजन करण्यात आले. विविध कलात्मक शोभेच्या वस्तू, रेडिमेड रांगोळी, कोरीव काम केले सुंदर दागिने, पेंटिंगचे विविध प्रकार, हाताने तयार केलेल्या बॅग, कपडे आणि विविध खाद्यपदार्थांचे प्रदर्शन पुण्यात आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला विनामूल्य. प्रवेश असून महाराष्ट्रातील विविध भागातील महिलांनी सहभाग घेत कलागुणांचे देखील सादरीकरण केले.
जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल सेंट्रल पार्क येथे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. प्रदर्शनाचे उद्घाटन निवृत्त पोलीस अधिकारी प्रतिभा जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजिका अभिलाषा बेलुरे, योगिता सिंघ, अपूर्वा पाटकर, दिशा जोशी, नम्रता जाधव टीकारे आदी उपस्थित होते.
पुण्यासह संगमनेर, धाराशिव, धुळे, नगर, लोणावळा, संभाजी नगर,ठाणे, संगमनेर , श्रीरामपूर, नाशिक या ठिकाणाहून महिला उद्योजिका प्रदर्शनास सहभागी झाल्या असून विविध प्रकारचे ७५ स्टॉल्स प्रदर्शनात आहेत. प्रदर्शनात मुलांसाठी आणि महिलांसाठी विविध स्पधेर्चे देखील आयोजन करण्यात आले होते.
नऊवारी ठसका, लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, दोन दिवसीय विनामूल्य गरबा कार्यशाळा देखील घेण्यात आली. प्रदर्शनात नवरात्र आणि दिवाळीसाठी लागणारे कपडे दागिने वेगवेगळ्या प्रकारचे सजावटीचे साहित्य लहान मुलांची खेळणी अशा अनेक गोष्टी पुणेकरांना खरेदी करता आले.