● एमएसएमईंना व्यवसाय कर्ज आणि मालमत्तेवर कर्ज (एलएपी) प्रदान करण्याचा उद्देश
● महिंद्रा फायनान्सच्या एमएसएमई एमएसएमई कर्ज पोर्टफोलिओला चालना देण्यासाठी भागीदारी
मुंबई महिंद्रा फायनान्स ही भारतातील आघाडीच्या एनबीएफसीपैकी एक कंपनी असून, महिंद्रा समूहाचा एक भाग आहे. कंपनीने आज डाटाटेक एनबीएफसी आणि एमएसएमई विभागातील भारतातील सर्वात मोठे सह-कर्जदार यूग्रो कॅपिटल लिमिटेड यांच्याशी भागीदारीची घोषणा केली. या भागीदारीमुळे सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्राला व्यवसाय कर्ज मिळेल व मालमत्ता (LAP) विरुद्ध सुरक्षित परवडणारी कर्जे मिळतील. त्यामुळे त्यांच्या व्यवसाय वृद्धीच्या शक्यता सुधारतील.
महिंद्रा फायनान्स आणि यूग्रो कॅपिटलचे सामर्थ्य या भागीदारीच्या संरचनेत एकत्र करण्याचे उद्दिष्ट आहे. यूग्रो त्यांचे डेटा विश्लेषण, वितरण नेटवर्क आणि ग्राउंड प्रेझेन्सचा फायदा घेतील. एमएसएमई व्यवसायही महिंद्र फायनान्सच्या ब्रँड इक्विटीचे भांडवल करण्यास सक्षम असतील. त्यामुळे विविध प्रकारच्या ग्राहकांच्या विस्तृत विभागांमध्ये क्रेडिट अॅक्सेस मिळेल. त्यामुळे वेळेवर आर्थिक साहाय्य शोधणाऱ्या एमएसएमईना वेळीच कर्ज मिळेल.
भागीदारीबद्दल बोलताना, महिंद्रा फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राऊल रेबेलो म्हणाले, “यूग्रो कॅपिटलसोबतची ही भागीदारी भारताच्या एमएसएमई इकोसीस्टमसाठी फायद्याची ठरेल. लहान व्यवसायातील कर्जातील अंतर भरून काढण्यास मदत करेल. व्यवसायांना वाढीस मदत करण्यासाठी या क्षेत्राला सर्वसमावेशक आर्थिक उपाय प्रदान करण्याचे आमचे उद्दिष्ट असेल. कारण उदयोन्मुख भारतासाठी जबाबदार आर्थिक उपाय भागीदार होण्याच्या आमचे ध्येय आहे.”
यूग्रो कॅपिटलचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक शचिंद्र नाथ म्हणाले, “या धोरणात्मक भागीदारीमध्ये महिंद्रा फायनान्ससोबतच्या आमच्या सहकार्यामुळे एमएसएमईंसाठी क्रेडिट उपलब्धतेमध्ये लक्षणीय वाढ होईल. एकत्रितपणे आर्थिक समावेशासाठी आमची सामाईक बांधिलकी पुढे घेऊन जात वेळेवर आणि कार्यक्षम वित्तपुरवठा उपाय वितरित करण्याचे आमचे ध्येय आहे. ही भागीदारी एमएसएमईचे सक्षमीकरण आणि देशभरात त्यांच्या वाढीला गती देण्यासाठी एक मजबूत पाऊल आहे. ‘एमएसएमई अच्छा है’ हे यूग्रोचा मूळ विश्वास प्रतिबिंबित करते आणि भारतातील प्रत्येक एमएसएमईच्या प्रत्येक गरजेची पूर्तता करण्याचे आमचे ध्येय अधिक मजबूत करते.
महिंद्र फायनान्सच्या एमएसएमई ग्राहकांना हाताळण्याचा अनुभव, हायपरलोकल स्कीम आणि किफायतशीर भांडवलाचा फायदा एमएसएमई व्यवसाय घेतील व एमएसएमई वित्त तज्ज्ञ म्हणून यूग्रो कॅपिटलच्या कौशल्याचा फायदाही एमएसएमईंना होईल. आर्थिक लँडस्केपचे गतिशील स्वरूप ओळखून, सहयोगाची कल्पना दीर्घकालीन वचनबद्धता म्हणून केली गेली आहे, प्रारंभिक करार तीन वर्षांचा आहे.